---
वाकी बुद्रुक : शिवसेनचे सगळे जुने शिवसैनिक माझ्याबरोबरच आहेत त्यामुळे विरोध करायचे असेल तर तालुक्यात येऊन करावा त्यावेळी कार्यकर्त्यांकडूनच उत्तर मिळेल असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते यांनी शिवाजीराव आढळराव यांचा नामोल्लेख करत केला. गेल्या अनेक दिवसांपासून खेड प्रशासकीय इमारतीवरून मोहिते-पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात खडाजंगी सुरु आहे. त्यावरूनच मोहिते-पाटील यांनी पुन्हा आढळरावांवर टीक केली.
खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक मध्ये नव्याने साकारणाऱ्या नूतन ग्रामपंचायत इमारत व पाणंद रस्ते, गटार योजना अशा विविध विकास कामाचे उदघाटन गुरुवारी झाले. त्यावेळी ते बोलत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समिती माजी उपसभापती ज्योती अरगडे व सरपंच वैशाली जरे यांच्या प्रयत्नातून गावातील विकास कामांसाठी कोरोनाकाळात गेलेल्या एका वर्षाने पहिल्यांदा गावात उदघाटन करण्यात आले.
कोरोना काळात संपूर्ण वर्ष वाया गेलं पण आता विकास कामांचा धडाका संपूर्ण तालुक्यात सुरु आहे. आम्ही सर्वाना सोबत घेऊन आमच्या तालुक्याचा विकास करत आहे.विकास कामांच्या बाबतीत सगळे एकत्र येऊ आणि तालुका आणि तालुक्यातील सर्व गावे झकास करू असं आश्वासन त्यांनी दिले. आमदार दिलीप मोहिते यांनी कोरोना संदर्भात काळजी घ्यावी असं आवाहन देखील केले.
या उदघाटन प्रसंगी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे,खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव टोपे, पंचायत समिती माजी उपसभापती ज्योती अरगडे,सरपंच वैशाली जरे यांच्यासह विविध खात्याचे प्रशासकीय अधिकारी,गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी उपसरपंच रामभाऊ टोपे यांनी केले.
--
०३वाकीबुद्रूीक दिलीप मोहिते
फोटो ओळी : विविध विकासकामांचे उद्घाटन करताना आमदार दिलीप मोहिते यावेळी निर्मला पानसरे, बाबाजी काळे,ज्योती अरगडे, सरपंच वैशाली जरे आदी