पुणे : उन्हाळा सुरु झाल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाच्या चटक्याने घामाच्या धारा निघत असतात. अशातच एखादं खंड पेय किंवा आयस्क्रिम मिळाली तर उन्हाचा कडाका कमी हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे तुम्ही पुण्यात असाल आणि तुम्हाला काहीतरी थंड पेय पिण्याची किंवा आयस्क्रिम खाण्याची इच्छा आहे तर पुण्यातील या नऊ ठिकाणांना जरुर भेट द्या.
सुजाता मस्तानी मस्तानी म्हंटलं की सुजाता मस्तानीचं नाव समाेर येतं. सुजाता मस्तानीची पुण्यात अनेक दुकाने आहेत. एकदा सुजाता मस्तानी प्यायली की माणूस पुन्हा पुन्हा या दुकानात येताे. काेथरुड, कर्वे रस्ता या ठिकाणी सुद्धा सुजाता मस्तानी मिळते. या मस्तानिची चव खूप काळ चिभेवर रेंगाळत राहते.
कावरे आईस्क्रिम आईस्क्रिमसाठी फेमस असलेलं ठिकाण म्हणजे कावरे आयस्क्रिम. याठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या आईस्क्रिम खायला मिळतात. येथील कसारा आईस्क्रिम जास्त फेमस आहे. तुळशीबाग या ठिकाणी कावरे आयस्क्रिम मिळते.
गुजर काेल्ड्रिंग हाऊस गुजर काेल्ड्रिंग हाऊस म्हंटलं की बाजीराव मस्तानी समाेर येते. या काेल्ड्रिंग हाऊसला माेठा इतिहास देखील आहे. जुन्या पुण्यातलं खूप वर्षांपासून सुरु असलेलं असं हे काेल्ड्रिंग हाऊस आहे. दगडू शेठ दत्तमंदिंराजवळ हे काेल्ड्रिंग हाऊस आहे.
कैलास लस्सीरास्ता पेठेतील अपाेलाे टाॅकीज जवळ मिळणारी कैलास लस्सी पुण्यातली फेमस लस्सी आहे. दिवसभर येथील लस्सी पिण्यासाठी माेठी गर्दी असते. कैलास लस्सीची पुण्यात विविध ठिकाणी आठ दुकाने आहेत. उन्हाळ्यात या ठिकाणची लस्सी पिण्याची मजाच वेगळी असते.
मटका कुल्फीराजस्थानी प्रकारची मटका कुल्फी पुण्यात फेमस आहे. पुण्यातल्या विविध भागात ही कुल्फी मिळते. खासकरुन डेक्कन भागात मिळणारी राजस्थानी कुल्फी खाण्यासाठी पुणेकर गर्दी करतात. त्यामुळे तुम्हाला कुल्फी खायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे.
पूना काेल्ड्रिंग हाऊसटिळक रस्त्यावरील पूना काेल्ड्रिंग हाऊस हे सुद्धा पुण्यातील जुने दुकान आहे. येथे विविध प्रकारच्या आईस्क्रिम खायला मिळतात. येथील फालुदा फेमस आहे.
बुवा आईस्क्रिम हाऊस जसं या आईस्क्रिमच्या दुकानाचं नाव वेगळं आहे तशीच येथील आईस्क्रिम देखील आहे. सदाशिव पेठेतलं हे जुनं दुकान आहे.
माेहन आईस्क्रिमरविवार पेठेतल्या साेन्या मारुती चाैकात माेहन आईस्क्रिम मिळते. या ठिकाणची बासुंदी जास्त फेमस आहे. त्याचबराेबर वेगवेगळ्या आईस्क्रिम सुद्धा तुम्ही ट्राय करु शकता.
दुर्गा पुण्यातलं दुर्गा कॅफे प्रसिद्ध आहे. काेथरुड मध्ये असणाऱ्या या कॅफेमध्ये तरुणांची गर्दी असते. येथील काेल्डकाॅफी खूप फेमस आहे. ही काेल्डकाॅफी पिण्यासाठी येथे दिवसभर गर्दी असते. त्यामुळे तुम्ही काेथरुड मध्ये असाल तर येथील काेल्डकाॅफी नक्की ट्राय करा.