सध्या १० वीतून अकरावीत गेलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांसाठी चाटे शिक्षण समूहातर्फे झुमद्वारे मार्गदर्शन आयोजित केले होते. प्रा. फुलचंद चाटे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.
चाटे म्हणाले की, पुढील दोन वर्षांनी ज्यावेळेस तुम्ही सीईटी/जेईई/नीटची परीक्षा द्याल, त्यावेळेस तुमच्या समोर अनेक आव्हाने असतील. तेव्हा जर तुमच्याकडे या प्रवेशपरीक्षांचे चांगले गुण असतील तरच तुम्हाला त्या संधी मिळवता येतील. अकरावी- बारावीमध्ये तुम्ही प्रवेशपरीक्षांची तयारी कशी करता आणि किती वेळ करता, यावरून तुमचे या परीक्षांचे गुण अवलंबून असतात.
सीबीएसई/स्टेट बोर्ड यांच्या अकरावीच्या प्रवेशाबाबत नियम ठरतील. परंतु, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी थांबून चालणार नाही. म्हणूनच चाटे रेसिडेन्सीयल कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी मे महिन्यातच अकरावीची बॅच चालू करून महाराष्ट्रातील विद्यार्थी तयारीला लागतो. हा कॅम्पस महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी अकरावी, बारावी सोबत सीईटी/जेईई/नीटची तयारी करून घेण्यासाठीच तयार केलेला आहे, असे यावेळी प्रा.चाटे म्हणाले.
फोटो - फुलचंद चाटे