शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

"मोठे प्रश्न सोडवायचे आहेत तर मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अन् मतदान करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 3:05 PM

या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख न करता टीका केली...

इंदापूर (पुणे) : दीर्घकालीन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नरेंद्र मोदींचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. १७) येथे केले. व्यापारी व वकिलांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. वाघ पॅलेसमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचा नामोल्लेख न करता टीका केली. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत सत्तेवर असणारांनी सतत पंतप्रधानांवर टीका केली. त्यामुळे केंद्रातील कोणतेही काम बारामती लोकसभा मतदारसंघात, इंदापूर विधानसभा मतदार संघात आले नाही असे सांगत खा. सुळे यांना टोला मारला.

सात मे रोजी पाच वाजल्यानंतर जो तुम्हाला ओळखेल, तुमचे कामे मार्गी लावेल, तुमच्या समस्या सोडवेल, विकासाचे धोरण उभे करेल तालुक्यात विविध नवनवीन संकल्पना आणण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या संकटात तालुक्यासोबत उभा राहील अशाच उमेदवाराला मतदान करा असे आवाहन पवार यांनी केले.

इंदापूर तालुक्यात नव्या योजना आणण्यात येतील. शहरातील रखडलेली कामे लवकरच मार्गी लागतील. न्यायालयाच्या इमारतीत परिसरात नवीन सुधारणा करण्यात येतील. मुख्यबाजार पेठेमधील रस्ता रुंदीकरण, अतिक्रमणे व विविध विकासाचे विषय लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही पवार यांनी दिली. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दर महिन्याला प्रशासनाची बैठक लावून सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम सुरु करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.   'ते' तुम्हाला बाहेरचे वाटणार नाहीत घरचे वाटतील-

खासदारांनी आपल्या कामात ढवळाढवळ करु नये अशीच आमदारांची वा आमदार होऊ इच्छिणारांची अपेक्षा असते. मला जो काही चाळीस वर्षांचा अनुभव आहे तो बघता आमचा जो उमेदवार आहे तो योग्य पध्दतीने काम करेल. कामात ढवळाढवळ करतील असे वाटत नाही. ते तुम्हाला बाहेरचे वाटणार नाहीत घरचे वाटतील, या शब्दात अजित पवार यांनी महायुतीच्या उमेदवार सूनेत्रा पवार यांची भलावण करत, शरद पवार यांच्या 'त्या' विधानाचा समाचार घेतला.

'पाहिजे तेवढा निधी देईन. निधी द्यायला आम्ही सहकार्य करु पण आमच्यासाठी मशीनची बटण दाब. म्हणजे मला ही निधी देता येईल नाहीतर माझा हात आखडता येईल'...असे विवादास्पद विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४baramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीSupriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवारdaund-acदौंड