"विकास करूनही वेगळा निर्णय घेणार असाल तर, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा"; अजित पवार थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 03:31 PM2024-09-08T15:31:56+5:302024-09-08T15:34:08+5:30

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दोऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका मेळाव्याला संबोधित केले.

If you want to take a different decision even after development Baramatikars should get an MLA except me says Ajit Pawar | "विकास करूनही वेगळा निर्णय घेणार असाल तर, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा"; अजित पवार थेटच बोलले

"विकास करूनही वेगळा निर्णय घेणार असाल तर, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा"; अजित पवार थेटच बोलले

Ajit Pawar ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज बारामती दोऱ्यावर आहेत, आज त्यांनी एका मेळाव्याला संबोधित केले.  यावेळी अजित पवार यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य केले. " एवढी विकासकामे करुनही जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर बारामतीलाही वेगळा आमदार मिळाला पाहिजे,यानंतर माझ्या आमदारकीच्या कार्यकाळातील आणि नव्या व्यक्तीच्या कामाची तुलना करावी',असं विधान अजित पवार यांनी केले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. 

धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं? मनोज जरांगे पाटलांनी सगळंच सांगितलं

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य केले आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून येगेंद्र पवार यांनी उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील प्रचारातही लोकसभेला जिंकून दिले तरच विधानसभेला उभं राहणार असे जाहीर सांगितले होते. दरम्यान, आज बारामती येथे जाहीर मेळाव्यात केलेल्या या जाहीर विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. 

'बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला पाहिजे'

बारामती येथील एका मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले,मी पण शेवटी माणूस आहे. मला पण कधी कधी विचार येतो की, एवढी सगळी कामे करुन बारामतीकर वेगळा पण निर्णय घेऊ शकतात. तर मग आपण पण आता ३३, ३४ वर्षे झाली. मी तर आता दुसऱ्यांना खासदार करु शकतो, राज्यसभा दुसऱ्याला दिली. त्याआधी सुनेत्रा पवार यांना दिली. आमदारही दुसऱ्याला केले. पण आता अशीच गंमत होणार असेल तर आता झाकली मूठ सव्वा लाखाची. आता आपणही समाधानी आहे. जिथं पिकतं, तिथं विकत नसतं. एकदा बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही माझी १९९१ ते २०२४ ची तुलना करा, असंही अजित पवार म्हणाले.

"न सांगता रस्ता होतो. न सांगता पाण्याच्या योजना सुरू होतात. आता कुठल्याही भागात गेला तर रस्ता नाही असं नाही. मेडिकल कॉलेज न मागता मिळतंय.तुम्ही काम लगेच विसरुनच जाता. विकासकामे केली की लगेच काहीजण दुसऱ्या बाजूला टपऱ्या टाकतात, असं काही करु नका. सकाळपासून उठून कामे करावी लागतात पण काही जण आमची चेष्टा करतात, त्याच्याबद्दल म्हणने काही नाही, जे आहे ते आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Web Title: If you want to take a different decision even after development Baramatikars should get an MLA except me says Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.