सुपे (बारामती) : सद्याचे सरकार शेतकरी विरोधी असुन त्याच सरकारमध्ये काही सहभागी होऊन आम्हालाच मतदान करा असा दम देत आहेत. मात्र जे दम देत आहेत त्यांना त्या जागेवर कोणी बसवलं आहे हे तुम्हाला अधिकसांगायची गरज नाही. असा अप्रत्यक्ष टोला माजी केंद्रिय कृषी मंत्री शदर पवार यांनी अजित पवार यांना लगावला. सुपे येथील पुजा गार्डन येथे जनसंवाद दौऱ्याच्यानिमित्ताने शरद पवार बोलत होते. सद्याचे सरकार हुकुमशाहासारखे वागत असुन लोकशाहीचे अधिकार उद्धस्थ करण्याचे काम करीत आहे. तसेच सत्तेचा गैरवापर करुन दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम त्यांनी केले. या सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबवली. त्यामुळे शेतकऱ्याच्या कांद्याचा आणि सोयाबिन पिकाचा उत्पादन खर्चही निघत नाही. या सरकारला निवडणुकित शेतकरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्यांना आधी निवडून दिले त्यांनी संसदेत तुमचे प्रश्न मांडले. त्यात सुप्रिया सुळेंचे नाव पहिले असल्याचे सांगून पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला. जनाई - शिरसाई उपसा जलसिंचन योजना कोणी राबवली हे शेतकऱ्यांना सांगु नये. मी दिल्लीतील काम पहात असताना राज्याची जबाबदारी तालुक्यातील प्रतिनिधीकडे दिली होती. पण त्यांनी काय दिवे लावलेत हे आता पाहतोय.
यावेळी सभेत पवार बोलत असताना एक चिठ्ठी व्यासपिठावर आली. त्यात जनाई - शिरसाईचे पाणी हवे असेल तर घड्याळाला मतदान करा म्हणुन दम दिला जातो. अन्यथा तुमची विकास कामे करणार नाही अशी भाषा वापरली जाते. पण एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण दम देतो आहोत त्या पदापर्यंत कोणी आणले हे विसरता कामा नये असा खोचक टोला पवार यांनी अजित पवार यांना लगावला.