शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

"....पण जर सामाजिक कामं करून तुमचा खांदा दुखत असेल तर आमच्या खांद्यावर भार द्या!" 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 7:25 PM

बारामतीत मनसे राष्ट्रवादीत जुंपली..!

बारामती:बारामतीतराष्ट्रवादी काँग्रेसमनसेत चांगलीच जुंपली आहे. मनसेचं बारामतीत थेट राज्यपालांना लक्ष घालण्याची केलेली मागणी राष्ट्रवादीच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने मनसेला बारामती व उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यापेक्षा एखादं कोविड सेंटर उभारा असे जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यात आता परत एकदा मनसेने राष्ट्रवादीला 'जर सामाजिक कामं करून तुमचे हात दुखत असतील तर आता थोडा भार आमच्या खांद्यावर द्या अशा शब्दात जोरदार टोला लगावला आहे.

बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने आमच्याशी संपर्क साधत होते. याबाबत प्रशासन अधिकाऱ्यानी आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली. ‘अजितदादां’ना राज्याचा व्याप असल्याने त्यांना संपर्क करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होत नव्हता. त्यामुळे घटनात्मक प्रमुख म्हणुन कोरोनाबाधितांना न्याय मिळवुन देण्यासाठी राज्यपालांना पत्र पाठविले.यामध्ये कोणाचा अवमान करण्याचा प्रश्नच नाही,तो हेतू देखील नव्हता,असे प्रत्युत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी दिले आहे.

अ‍ॅड. पाटसकर यांनी बारामती शहरातील कोरोना रुग्णांना जाणवणारा बेड आणि व्हेंटिलेटर,रेमडेसिविरच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांना बारामतीत लक्ष घालण्याची मागणी केली  आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ही मागणी म्हणजे बारामतीचे नाव खराब करण्याचा प्रकार असल्याचा टोला मनसे नेत्यांना लगावला आहे.त्यावर आज पाटसकर यांच्यासह नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक सुनील सस्ते यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

अ‍ॅड. पाटसकर म्हणाले,रेमडेसिव्हीर देताना जवळच्या बगलबच्च्यांना प्राधान्य दिले जात होते.त्यावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नव्हते.अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करुन देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाहि.त्यामुळे शेवटचा प्रयत्न म्हणुन राज्यपालांना संपर्क साधला,यामध्ये पवार,बारामतीला बदनाम करण्याचा कोणताही हेतू नव्हता.वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता कोविड उपचार केंद्रांमध्ये समन्वय साधावा,यामध्ये आलेला विस्कळीतपणा दूर करण्याची गरज आहे.सामाजिक काम करुन खांदे दुखत असतील तर आता आमच्या खांद्यावर भार द्यावा,असा टोला पाटसकर यांनी लगावला.

नगरसेवक सस्ते म्हणाले, शहरातील लोकसंख्या पाहता मतदान केंद्राप्रमाणे लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी आपण प्रशासनाकडे केली होती.या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी,प्रांताधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारले. मात्र, त्या सर्वांवर एका व्यक्तिचे ‘प्रेशर’ होते. त्यामुळे माझ्या मागणीची दखल घेतली जात नव्हती. माझी मागणी कोणत्या पक्षाची नाही,बारामतीकरांसाठी केलेली ही मागणी आहे.त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ढोल आंदोलनाचा पर्याय निवडावा लागला.त्यानंतर माझ्या पत्राची दखल घेण्यात आली.आता येथील शाळा धुवुन स्वच्छ करण्यात आली आहे.येथे लसीकरण केंद्र निर्मितीच्या दिशेने पावले पडली आहेत.

आम्हाला कोणतेही राजकारण करण्याची गरज नाही. आम्ही देखील आमच्या भागातील शाळेत कोविड केअर सेंटर उभारणार आहे.त्यासाठी शासनाची इमारत असते,शासन तेथील सर्व खर्च करते.नगरपरिषद  कर्मचारी,डाटा एन्ट्री आॅपरेटर सर्व सुविधा पोहच करते. असे असताना त्याचे श्रेय घेण्याची आमची वृत्ती नाही. कोविड निर्मूलनाबाबत आम्हाला विश्वासात घेतले जात नाहीत. एवढच काय राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांना कोणतीही माहिती मिळत नसल्याचे वास्तव आहे.नगराध्यक्षांना अनेक पत्र पाठवून सुद्धा त्यांनी साधी बैठक घेतली नसल्याचा आरोप सस्ते यांनी केला आहे.———————————————...सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारणार

प्रांताधिकाऱ्यांकडे कोविड उपचार केंद्रासाठी जागेची मागणी करण्यात आली आहे.लवकरच कोरोनाबाधित रुग्णांसाठी आमच्या भागात सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल.यामध्ये श्रीमंत बाबुजी नाईक मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह अ‍ॅड सुधीर पाटसकर यांची सामाजिक संस्था ,मनसे कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार असल्याचे नगरसेवक सुनील सस्ते यांनी सांगितले.यामध्ये कोणतेही राजकारण करण्याची आमची भूमिका नाही.——————————

टॅग्स :BaramatiबारामतीMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्या