शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

तरुण पिढीचे विधायक कामात दुर्लक्ष : गिरीश बापट 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:27 PM

आपल्या संस्कृतीविषयी आणि संस्कारांविषयी जाणून घेण्यापेक्षा सध्याच्या युवकांना कट्टयावर बसायला अधिक आवडते. यामध्ये परिवर्तन घडायला हवे.

ठळक मुद्देपुणे प्रार्थना समाजाच्या वतीने पुरस्कार 

पुणे : आपल्या संस्कृतीविषयी आणि संस्कारांविषयी जाणून घेण्यापेक्षा सध्याच्या युवकांना कट्टयावर बसायला अधिक आवडते. यामध्ये परिवर्तन घडायला हवे. तरुण पिढी सध्या विधायक कामाकडे दुर्लक्ष करताना दिसते. परंतु, तरुणांनी व्यक्ती, संस्थांच्या कार्यातून स्फूर्ती, प्रेरणा घेऊन सामाजिक काम करण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले. पुणे प्रार्थना समाजाच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापट यांच्यासह संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे, ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे डॉ. प्रकाश तुपे, अनिरुद्ध देशपांडे, मानव्य संस्थेचे शिरीष लवाटे, रमेश चव्हाण, निवृत्त एअर कमोडोर अशोक शिंदे, भरत शहा, पुणे प्रार्थना समाजाचे अध्यक्ष एअर कमोडोर (निवृत्त) अशोक शिंदे, संस्थेचे चिटणीस प्रा. डॉ. दिलीप जोग, सहचिटणीस सुषमा जोग, डॉ. दत्तात्रय लाटे, समीर चौधरी, अनुराधा शिंदे उपस्थित होते.  यावेळी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार ज्योतिर्विद्या परिसंस्थेला, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार रमेश चव्हाण व डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कार मानव्य या संस्थेला प्रदान करण्यात आला. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार हा पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार करणाऱ्या संस्थेस देण्यात येतो. समाजातील विविध घटकांमध्ये सामंजस्याचे काम करणाºया व्यक्तीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात येतो. डेव्हिडा रॉबर्टस पुरस्कार विशेष बालकांसाठी कार्य करणाºया संस्थेला देण्यात येतो. यावेळी गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना प्राचार्य वि.के. जोग, गुरुवर्य बा.ग. जगताप, सुयोग आणि कलोपासना पुरस्कृत लक्ष्मीबाई प्रतापराव शिंदे शिष्यवृत्ती देण्यात आल्या.प्रा. डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘आधुनिक भारताच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, विद्वत्तेच्या क्षेत्रात प्रार्थना समाजाचे खूप मोठे योगदान आहे. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांसारख्या दिग्गज लोकांनी प्रार्थना समाजासाठी खूप मोठे कार्य केले आहे. प्रार्थना समाजाचे महाराष्ट्रावर आणि भारतावर खूप मोठे ऋण आहे. सुषमा जोग यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रय लाटे यांनी आभार मानले. 

टॅग्स :girish bapatगिरीष बापट