वाघोली परिसरात अनेक मोठमोठ्या सोसायट्या तयार झाल्या आहेत. या ठिकाणी नागरिकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक करून प्लॉट खरेदी केले आहेत. परंतु या अवजड वाहनातून उडणाऱ्या धुळीचा बारीक कणांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एक दोन वाहनांवर कारवाई करत कारवाई केल्याचे नुसते नाटक केल्याचे दाखवले जाते. परंतु पाठीमागे मात्र अनेक वाहने ओळखीची व 'अर्थ' कारणामुळे तशीस सोडून दिली जातात. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्वांना सारखेच नियम लावत सर्व वाहनांवर कडक व कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी मागणी सुधीर दळवी यांच्या वतीने संबंधित विभागाला करण्यात आली आहे.
***********
वाघोली व परिसरात मोठ्या प्रमाणात डंपरमधून खडीची वाहतूक केली जाते. ही वाहतूक केली जात असताना काही ठराविक लोकांवर कारवाई केली जाते. बाकीच्यांना मात्र तसेच सोडून दिले जाते. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्वांना सारखे नियम ठेवावेत. जे नियम पाळत नाहीत त्या सर्वांच्या कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आम्ही पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर मोठे जन आंदोलन उभारू.
-सुधीर दळवी, सामाजिक कार्यकर्ते, वाघोली