आळंदीमध्ये अवैध्य धंदे, चुकीची कामे करणाऱ्यांना टायरमध्ये घ्या; अजित पवारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 07:33 PM2024-09-12T19:33:41+5:302024-09-12T19:34:07+5:30

आळंदी शहरात लॉजिंगचाही सुळसुळाट झालाय, तसेच गैर धंदे करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही

Illegal businesses in Alandi, arrest those doing wrongdoing; Ajit Pawar's warning | आळंदीमध्ये अवैध्य धंदे, चुकीची कामे करणाऱ्यांना टायरमध्ये घ्या; अजित पवारांचा इशारा

आळंदीमध्ये अवैध्य धंदे, चुकीची कामे करणाऱ्यांना टायरमध्ये घ्या; अजित पवारांचा इशारा

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत बेकायदेशीरपणे सुरू असलेले अवैध्य दोन नंबरचे धंदे पोलिसांनी कारवाई करून तात्काळ बंद करावेत. यासंदर्भात स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन सविस्तर माहिती घेणार आहे. आळंदी शहरात लॉजिंगचाही सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे गैर धंदे करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. चुकीची कामे करणाऱ्यांना टायरमध्ये घ्या आणि ऐकत नसतील तर त्यांच्यावर मोक्का लावा अशा कडक शब्दात मुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना तंबी दिली.
        
तीर्थक्षेत्र आळंदीसह खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या जनसंवाद दौऱ्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तीर्थक्षेत्र आळंदी हे लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. माउलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनाला अनेक भाविक आळंदीत येतात. मात्र याठिकाणी अनेक दिवसांपासून राजेरोसपणे अवैद्य धंदे (वेश्या) सुरु असल्याचे स्थानिक महिला भगिनींनी सांगितले. यासंदर्भात संबंधित पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर पावले उचलली जात नसल्याची खंत व्यक्त केली. आळंदीतील अशी गैरकृत्ये पोलिसांनी तात्काळ बंद करावी. या प्रकारांची स्वतः माहिती घेणार आहे. यावर आळा घालण्यात अपयश आल्यास संबंधित जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करू असे पवार यांनी सांगितले.

Web Title: Illegal businesses in Alandi, arrest those doing wrongdoing; Ajit Pawar's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.