याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनातर्डोबा वाडी येथील घोडनदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक किरण उंदरे, पोलिस निरीक्षक बिरदेव काबुगडे, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सुनील मोटे, पोलिस नाईक संजू जाधव, अनिल आगलावे, करणसिंग जारवाल, प्रवीण पिठले, तुकाराम गोरे यांच्या पथकाने दि.१४ रोजी रात्री गस्ती दरम्यान तर्डोबावाडी येथे चार ठिकाणांहून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून जेसीबीच्या साह्याने हायवा ट्रकमध्ये तीन ब्रास वाळू भरून वाहतूक करणाऱ्या चार ट्रक करडे, न्हावरा व तर्डोबावाडी येथे पकडून ट्रकसह ४५ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.
निमोणे, शिंदोडी येथे नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने शिरूर व श्रीगोंदा तालुका हद्दीमधून मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरु असून यावर महसूल व पोलिस खाते कधी कारवाई करणार, असा प्रश्न जनतेमधून केला जात आहे.