पुणो : वीस आठवडय़ांपुढील गर्भाचा गर्भपात करण्यास कायद्याने मनाई असतानाही एका महिलेचा वीस आठवडय़ांपुढील गर्भपात करणा:या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश राज्य कुटुंबकल्याण कार्यालयाने पुणो महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.
भवानी पेठेतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेचा 2क् आठवडय़ांपुढील गर्भ काढून टाकल्यासंदर्भात गणोश बो:हाडे यांनी ऑक्टोबर महिन्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पालिकेच्या पीसीपीएनडीटीच्या समुचित प्राधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी त्या रुग्णालयाची तपासणी केली. या तपासणीमध्ये डॉक्टरांनी गर्भलिंग निदान केल्याचे दिसून आले नव्हते. मात्र 21 आठवडे 6 दिवसांचा गर्भ काढून टाकल्याचे रुग्णालयातील कागदपत्रंमधून दिसून आले होते. जे एमटीपी कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. या संदर्भातील अहवाल तयार करून डॉ. जाधव यांनी राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाला पाठविला होता. त्याआधारे राज्य कुटुंबकल्याण विभागाने संबंधित रुग्णालय व डॉक्टरांवर कारवाई करण्याचा तत्काळ आदेश पुणो महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिला होता. मात्र त्यास महिना उलटला तरी कारवाई झाली नाही. त्यामुळे पालिकेला 21 नोव्हेंबरला पत्र पाठवून तत्काळ कारवाईचे आदेश राज्य कुटुंबकल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)