शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

उजनीतील बेकायदा जलवाहतूक ठरली दुर्घटनेला कारणीभूत; शॉर्टकट जिवावर बेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 3:07 PM

उजनीतील जलाशयात एकाच कुटुंबातील ४ जण आणि २ बोट चालक असे ६ जण बुडाले असून त्यांचा अजूनही शोध सुरु आहे

बाभुळगाव : उजनी धरणाच्या जलाशयात काल बोट उलटून झालेल्या अपघाताला राजरोसपणे सुरू असलेली बेकायदा जलवाहतूक कारणीभूत ठरली असून यापूर्वीही अशा रीतीने दुर्घटना घडून दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर कडाक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. करमाळा तालुका आणि इंदापूर तालुका यांच्या मध्ये भीमा नदी असून यावरच उजनी धरण बांधण्यात आले आहे. यामुळे या परिसरात धरणाच्या जलसाठ्यामुळे अथांग पाणी पसरले आहे .    करमाळ्यातून इंदापूर कडे जाण्यासाठी गावागावातून पलिकडच्या तिराला जाण्यासाठी बेकायदा जल वाहतूक राजरोस पणे सुरू असते. अशा बोटींवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने नसल्याने हा सर्व प्रवास जीवावर बेतनारा असतो. यापूर्वीही अशा पद्धतीने बोटीतून पाण्यात गेल्यावर अनेक दुर्घटना घडल्या आहेत. तरीही प्रशासन या धोकादायक प्रवासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असते . 

करमाळा येथून इंदापूर कडे रोड मार्गे प्रवास करण्यासाठी शंभर किलोमीटरचा वळसा मारावा लागतो. यासाठी तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र बोटीतून केवळ पाच ते सात किलोमीटर पाण्यातून हा धोकादायक प्रवास केल्यावर तासाभरात पलिकडच्या इंदापूर तालुक्यात जाता येते. हाच शॉर्टकट जीवावर बेतू शकतो याचा विचार ना बोट वाले करतात, ना यातून प्रवास करणारे प्रवासी, त्यामुळे अशा दुर्घटना सातत्याने घडत असतात. दुर्घटना झाल्यावर अलर्ट मोडवर आलेले प्रशासन पुन्हा या जलवाहतूक कडे दुर्लक्ष करते आणि पुन्हा नवीन दुर्घटना समोर येते. 

या बेकायदा बोटींवर ना लाईफ जॅकेट असतात, ना बोट बुडायला लागली तर प्रवाशांना वाचवण्याची उपकरणे असतात. बोट चालक देखील पुरेसा प्रशिक्षित नसल्याने दुर्घटने वेळी त्यालाही जीव वाचवत येत नाही. असाच प्रकार काल कुगव ते कळाशी या दरम्यान घडला आणि बोटीतून सहा जणांचा शोध वीस तासानंतर देखील लागू शकलेला नाही . 

काल उजनी धरणात बुडालेले सर्व सहा जण करमाळा तालुक्यातील कूगाव व झरे या गावातील असून या परिसरावर कालपासून शोककळा पसरली आहे .  करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडालेल्यांची नावे आहेत. त्यांचा शोध अजूनही सुरु आहे. काल रात्रीपासून कुगाव् व झरे गावातील गावकरी मोठ्या संख्येने दोन्ही तीरावर गोळा झाले आहेत. भीमा नदीच्या किनाऱ्यावर येऊन बसले आहेत. झरे गावात काल रात्रीपासून शोककळा पसरली आहे. गावात सकाळपासून संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण असून प्रत्येकाला चमत्कार होण्याची अपेक्षा आहे. एनडीआरएफच्या टीम कडून सकाळी पासून युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. मात्र अद्यापही एकाच देखील शोध लागलेला नाही.

 झरे गावात गोकुळ दत्तात्रय जाधव हे आई, वडील, भाऊ,दोन बहिणी सोबत लहानाचे राहतात. काही वर्षांपूर्वी गोकुळचे लग्न कोमल यांच्या सोबत झाले होते. गोकुळ जाधव हे प्लम्बिंगचे काम करत आपली उपजीविका चालवत असे. आपल्या पाहुण्याच्या घरी जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गोकुळ जाधव व त्यांची पत्नी कोमल, दोन चिमुकले हे काल संध्याकाळी कूगाव येथून दुपारी कळाशी कडे निघाले होते. यावेळी अचानक सुरू झालेल्या या वादळी वाऱ्यात ही बोट उलटली आणि गोकुळ जाधव, कोमल जाधव आणि दोन्ही चिमुकले भीमा नदीच्या पात्रात बुडाले.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीSwimmingपोहणेSocialसामाजिकIndapurइंदापूर