मोरगाव : गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक निरा (ता. पुरंदर )येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ने ताब्यात घेतला आहे . ४८० बॉक्स असलेली अवैध दारु व ट्रकसहीत सुमारे पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन विभागाने ताब्यात घेतला आहे .
गोवा राज्यात परवानगी असलेल्या व्हेस्की व ऱॉयल चॅलेंजर दारु घेऊन ट्रक क्र एम. (एच. १८ ए.ए . ८३५५ ) येत असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र २ ला समजली सापळा लावून निरा गावच्या हद्दीत निरा- लोणंद रस्त्यालगत असलेल्या ज्ञानेश्वर महाराज विसावा येथे संबंधित ट्रक थांबविण्याच्या या सूचना देण्यात आल्या. ट्रकची तपासणी केली असता सुरवातीला दोनशे लिटरचे मोकळे बॅलर आढळून आले .
अधिक तपासणी केली असता ट्रकमध्ये रॉयल ब्लॅक व्हिस्की १८० मिली क्षमतेचे ३० बॉक्स , इम्पेरियल बल्यू व्हिस्कीचे २७५ बॉक्स, ऱॉयल चॅलेंजरचे ५० बॉक्स , ट्युबर्ग स्ट्रॉंग प्रीमिअम बियरचे ७५ बॉक्स, किंग फिशर स्ट्रॉंग प्रीमियमचे ५०० मिली क्षमतेचे ५० बॉक्स असे एकूण ४८० बॉक्स ताब्यात घेतले आहे . याचबरोबर ट्रकसोबत असणारी ईको गाडी (जीजे.१ केवाय. ९८४८ ) ताब्यात घेतले आहे. वाहनासह एकूण ४९,०९,६०० रुपयांचा मुद्देमाल व राजेश लक्ष्मण लोहार (वय ४२ हिसाळे, जि. धुळे) , सुखविंदरसिंग मलकितसिंग ओजला ( वय २५ कर्तापुर ता. घमेला, जि जालंधर, पंजाब), राजु सुरसिंग सोलंकी (वय ३६, रा. गायत्री आश्रम जांभली ता. शेंदवा जि.बडवाणी मध्यप्रदेश) व शैलेशकुमार रामकृष्ण कौरी (वय २५, रा. अहमदाबाद, गुजरात )यांना ताब्यात घेतले आहे .
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे ,व अधिक्षक संतोष झगडे यांच्या मार्गक्रमणाखाली भरारी पथक क्र २ चे दुय्यम निरीक्षण विकास थोरात , एस .के. कानेकर ,सतीश ईंगळे ,प्रशांत धाईंजे, गणेश नागरगोजे ,संतोष गोंदकर, एस.बी. मांडेकर, नवनाथ पडवळ , केशव वामने , बी. आर. सावंत महीला जवान मनीषा भोसले यांनी कारवाई केली आहे . आरोपींना सासवड न्यायालयात हजर केले आहे .