स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरिक्षक पद्माकर धनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार:
शुक्रवार ( दि. १६ ) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पाटस परिसरात एका फरारी आरोपीचा शोध घेत होते. यावेळी कुसेगाव - पाटस रस्त्याने टोलनाक्याकडे एक संशयास्पद व्यक्ती बुलेट मोटारसायकल वरुन जाताना दिसला. त्याला पोलिसांनी थांबाविण्याचा प्रयत्न केला असता तो पळाला. मात्र मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्टल , तीन जिवंत काडतुसे ,तलवार , बुलेट मोटारसायकल , मोबाईल असा एकुण एक लाख सत्तर हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.बेकायदेशीर हत्यारे बाळगल्या प्रकरणी धनाजी माकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने हत्यारे कोठून आणले हत्यारांचा कोठे वापर केला, याबाबतची चौकशी यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहे.पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख , बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर धनवट , सचीन काळे , महेश गायकवाड ,निलेश कदम , सचिन गायकवाड , सुभाष राऊत , गुरु गायकवाड , मुकूंद कदम या पोलीस पथकाने कारवाई केलेली आहे. ]
दौंड तालुक्यातील कुसेगाव , पडवी , पाटस यासह अन्य ठिकाणी धनाजी माकर याची दहशत आहे. ग्रामस्थांना मारहाण , दमदाटी करून हत्यारांची दहशत दाखावायचा त्याच्या भीतीपोटी ग्रामस्थ पोलिसात तक्रार देत नसल्याचे पोलिसांनी सांगीतले.
धनाजी माकर हा बेकायदेशीर हत्यारे बाळगत पाटस टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत आहे. आणि ही माहिती पाटस टोल प्रशासनाने पोलिसांपासून लपवली आहे हे सिध्द होते.
पाटस टोलनाक्याच्या सुरक्षा रक्षककडे बेकायदेशीर हत्यारे सापडल्या प्रकरणी आरोपीसह पोलीस आधिकारी
आरोपीकडे सापडलेले हत्यारे