शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आभास : पृथ्वीराज चव्हण; पुण्यात साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 07:09 PM2018-02-21T19:09:57+5:302018-02-21T19:14:49+5:30

पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंजाब नॅशनल बँक, हायपरलूप तंत्रज्ञान कोरेगाव भिमा येथील दुर्घटना यासह मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या गुंतवणीच्या व रोजगाराच्या आकडेवारीवर टीका केली.

illusion of progress from Government : prithviraj Chavan; congress program in Pune | शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आभास : पृथ्वीराज चव्हण; पुण्यात साधला संवाद

शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आभास : पृथ्वीराज चव्हण; पुण्यात साधला संवाद

Next
ठळक मुद्देशासनाकडून गुंतवणूकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर : पृथ्वीराज चव्हाण'गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के'

पुणे : मेक इन इंडिया व मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे सादर करून राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा केवळ आभास निर्माण केला आहे. मात्र, राज्याच्या कृषी व अर्थ व्यवस्थेचे कंबरडे मोडले असून राज्यातील बेरोजगारी वाढत चालेली आहे. परंतु, अनावश्यक प्रकल्प उभे करून जनतेवर विविध करांचा बोजा लादला जात आहे. शासनाकडून गुंतवणूकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर केली जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पुण्यात केला.
शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंजाब नॅशनल बँक, हायपरलूप तंत्रज्ञान कोरेगाव भिमा येथील दुर्घटना यासह मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या गुंतवणीच्या व रोजगाराच्या आकडेवारीवर टीका केली. या प्रसंगी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील गुंतवणुकीची व रोजगार निर्मितीची आकडेवारी जाहीर केली जात आहे. मात्र, मेक इन इंडियासह मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्सच्या पार्श्वभूमीवर सांगितली जाणारी आकडेवाडी केवळ जाहिरातबाजी असून कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या गावात कोणती कंपनी, कोणते उत्पादन घेणार आहे. त्यातून किती रोजगार निर्मिती होईल, याची माहिती राज्य शासनाने जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी होत चालली असून गुजरातमध्ये गुंतवणूक वाढत आहे, असेही त्यांनी नमूद केले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र सोडून देवून अहमदाबादमध्ये दिले आहे. हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असून त्यात फडणवीस यांनी शरणागती पत्करून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास घात केला आहे. त्याचे उत्तर फडणवीस यांनी दिले पाहिजे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ट्रिलीयन डॉलर एवढी होईल, अशी घोषणा फडणवीस यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्स या कार्यक्रमात केली. परंतु, राज्याची अर्थव्यवस्था जवळपास ४०० बिलीयन डॉलर्सची आहे. गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के असून ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी किमान २०३२ साल उजाडणार आहे. परंतु, गेल्या तीन वर्षाच्या युती सरकारच्या कालावधीत राज्याची अर्थव्यव्सथा डबघाईला आली आहे, असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: illusion of progress from Government : prithviraj Chavan; congress program in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.