शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आभास : पृथ्वीराज चव्हण; पुण्यात साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 7:09 PM

पुणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंजाब नॅशनल बँक, हायपरलूप तंत्रज्ञान कोरेगाव भिमा येथील दुर्घटना यासह मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या गुंतवणीच्या व रोजगाराच्या आकडेवारीवर टीका केली.

ठळक मुद्देशासनाकडून गुंतवणूकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर : पृथ्वीराज चव्हाण'गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के'

पुणे : मेक इन इंडिया व मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे सादर करून राज्य शासनाकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा केवळ आभास निर्माण केला आहे. मात्र, राज्याच्या कृषी व अर्थ व्यवस्थेचे कंबरडे मोडले असून राज्यातील बेरोजगारी वाढत चालेली आहे. परंतु, अनावश्यक प्रकल्प उभे करून जनतेवर विविध करांचा बोजा लादला जात आहे. शासनाकडून गुंतवणूकीची व रोजगाराची फसवी आकडेवारी जाहीर केली जात आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पुण्यात केला.शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंजाब नॅशनल बँक, हायपरलूप तंत्रज्ञान कोरेगाव भिमा येथील दुर्घटना यासह मुख्यमंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या गुंतवणीच्या व रोजगाराच्या आकडेवारीवर टीका केली. या प्रसंगी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत चव्हाण आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील गुंतवणुकीची व रोजगार निर्मितीची आकडेवारी जाहीर केली जात आहे. मात्र, मेक इन इंडियासह मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्सच्या पार्श्वभूमीवर सांगितली जाणारी आकडेवाडी केवळ जाहिरातबाजी असून कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या गावात कोणती कंपनी, कोणते उत्पादन घेणार आहे. त्यातून किती रोजगार निर्मिती होईल, याची माहिती राज्य शासनाने जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच महाराष्ट्रातील गुंतवणूक कमी होत चालली असून गुजरातमध्ये गुंतवणूक वाढत आहे, असेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र सोडून देवून अहमदाबादमध्ये दिले आहे. हा मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव असून त्यात फडणवीस यांनी शरणागती पत्करून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास घात केला आहे. त्याचे उत्तर फडणवीस यांनी दिले पाहिजे.देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ट्रिलीयन डॉलर एवढी होईल, अशी घोषणा फडणवीस यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्वर्जन्स या कार्यक्रमात केली. परंतु, राज्याची अर्थव्यवस्था जवळपास ४०० बिलीयन डॉलर्सची आहे. गेल्या पाच वर्षात राज्याचा सरासरी विकासदर ७.३ टक्के असून ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी किमान २०३२ साल उजाडणार आहे. परंतु, गेल्या तीन वर्षाच्या युती सरकारच्या कालावधीत राज्याची अर्थव्यव्सथा डबघाईला आली आहे, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस