अधिसूचनेला विरोध : आयुष डॉक्टरांकडून केंद्राच्या निर्णयाचे स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आयुर्वेद डॉक्टरांना २८ प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा कायद्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी राज्यव्यापी संप पुकारला होता. संप यशस्वी झाल्याचा दावा आयएमएतर्फे करण्यात आला.
सुमारे १५,००० डॉक्टरांनी अत्यावश्यक नसलेल्या सेवा बुधवारी बंद ठेवल्या होत्या. ३६ सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांंमधील २५,००० विद्यार्थीही आणि १०,००० पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थीही संपात सहभागी झाले होते. यावेळी कोणत्याही स्वरुपाचा मोर्चा काढला नाही. महाराष्ट्रातील आयएमएच्या ४५,००० सदस्यांनी संपात सक्रिय सहभाग घेतल्याचे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.
---
आयुष डॉक्टरांकडून सीसीआयएमच्या अधिसूचनेचे स्वागत
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयातील पदव्युत्तर डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंदर्भात काढलेल्या अधिसूचनेचे स्वागत करण्यासाठी आयुष कृती समितीच्या माध्यमातून राज्यभरातील १,५०,००० पेक्षा अधिक आयुष डॉक्टरांनी गुलाबी फित लावून नियमितपणे वैद्यकीय सेवा प्रदान केली. केंद्र शासनाचे स्वागत व अभिनंदन करुन पाठिंबा देणारे पत्र तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.