सुपे : जिल्ह्यात पोलिसांच्या वतीने येत्या २६ जानेवारीला नव्याने सुरु होत असलेल्या ११२ या नंबरला फोन केल्यास काही वेळातच पोलीस व्हॅन आपल्या घटनास्थळी येऊ शकेल अशी सुविधा सुरु करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देखमुख यांनी सुपे येथे पत्रकारांना दिली.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात वार्षिक तपासणी कार्यक्रम जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आला. त्यानंतर सुपे येथे नव्याने होत असलेल्या पोलिस ठाण्याच्या जागेची पहाणी देखमुख यांनी केली. यावेळी पत्रकारांनी देखमुख यांच्याशी सुसंवाद सादला.
बारामती तालुक्यातील सुपे येथे नव्याने होत असलेल्या पोलिस ठाणेच्या जागेची पहाणी जिल्हा पोलिस अधिक्षक देखमुख यांनी केली. यावेळी सुपे येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने लवकरच पोलिस ठाण्याच्या इमारतीचे बाधकाम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे देखमुख यांनी या जागेची पहाणी केली. यावेळी विभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब शेंडगे, माजी तंटामुक्त अध्यक्ष अनिल हिरवे, अमोल बारवकर आदी उपस्थित होते.
यावेळी देखमुख म्हणाले की, पुरंधरला नव्याने होत असलेल्या विमानतळामुळे सुपे येथील पोलिस ठाण्याला विशेष महत्व प्राप्त होणार आहे.
--
फोटो क्रमांक : २२ सुपे अभिनव देशमुख
फोटो ओळी : सुपे येथे नव्याने होत असलेल्या पोलिस ठाण्याच्या जागेची पहाणी करताना जिल्हा पोलिस अधिक्षक देखमुख