राज्यातील अनेक रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनसाठी संघर्ष करावा लागत असून काही ठिकाणी ते चढ्या भावाने विकले जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. बेड उपलब्ध झाल्यानंतरही रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने कोरोना आजारामुळे मृतांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत असून रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी पडत आहे. मेडिकल स्टोअरमध्ये काळ्या बाजाराने काही ठिकाणी विकतात. लोक रस्त्यावर उतरले आहेत. शासनाने याची गंभीर दखल घेऊन काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांवरती कठोर कारवाई करावी. शासनाने तातडीने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा दूर करून जास्तीत जास्त प्रमाणात इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी व आवाहन हाजी इर्शाद आतार यांनी राज्य सरकारला केले आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा तातडीने सुरळीत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:09 AM