भोर : भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध गटांतील १९ जागांसाठी सन २०१५ ते सन २०२० च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारी अर्ज सहायक निबंधक सहकारी संस्था राजवाडा भोर येथील कार्यालयात मिळणार आहेत. अर्ज भरून पुन्हा त्याच कार्यालयात जमा करायचे आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी पी. एम. परब यांनी सांगितले.भोर तालुका बाजार समितीच्या मतदारसंघाची नावे व जागांची संख्या खालील प्रमाणे : कृषी पतसंस्था मतदारसंघ- एकूण जागा ११ पैकी सर्वसाधारण(७ जागा) महिला प्रतिनिधी (२ जागा) इतर मागास प्रवर्ग (एक जागा) भटक्या व विमुक्त जाती (एक जागा)ग्रामपंचायत मतदारसंघ- एकूण जागा ४ पैकी सर्वसाधारण(२ जागा),अनुसूचित जाती/जमाती (एक जागा) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (एक जागा),अनुज्ञाप्ती धारक व्यापारी व अडते मतदारसंघ (२ जागा) हमाली व तोलारी मतदारसंघ (एक जागा) कृषी प्रक्रिया पणन संस्था मतदारसंघ (एक जागा) २१ जुलै ते ४ आॅगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज सकाळी ११ ते दु. ४ या वेळात दाखल करायचे असून, जसजसे उमेदवारी अर्ज दाखल होतील त्यानुसार त्यांची प्रसिद्धी केली जाणार आहे. ६ आॅगस्टला उमेदवारी अर्जाची छाननी दुपारी एक वाजता छाननी पूर्ण होईपर्यंत करण्यात येणार आहे. ७ आॅगस्ट उमेदवारी अर्ज प्रसिध्द करणे. २४ आॅगस्ट उमेदवारी अर्ज मागे घेणे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, तर २६ आॅगस्ट निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हवाटप करणे. ११ सप्टेंबर मतदान, १२ सप्टेंबर निकाल जाहीर केला जाणार आहे.उमेदवारी अर्जाची किंमत १०० रु. व सर्व मतदारसंघासाठी अनामत रक्कम(डिपॉझीट) १०० रु. राहणार आहे. अंतिम मतदार यादी ३०० रु. शुल्क भरून निवडणूक कार्यालयात मिळणार आहे. अनुसूचित जाती/जमाती,भटक्या विमुक्त जाती/जमाती,विशेष मागस प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग उमेदवारास जातीचा दाखला उमेदवारी अर्जासोबत जोडावा लागणार आहे. आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराने अर्जासोबत आर्थिक दुर्बल असल्याचा दाखला जोडणे आवश्यक असल्याचे निवडणूक अधिकारी पी. एम. परब यांनी सांगितले. (वार्ताहर)
कृषी उत्पन्न बाजार समितीत लगबग
By admin | Published: July 24, 2015 4:39 AM