शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मानाच्या गणरायांचे हौदांमध्ये विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अन् पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अन् पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत रविवारी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. सकाळपासून पुण्यात गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवात दरवर्षीच्या परंपरेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मानाचा पहिला श्री कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यकर्ते, भक्तगण आणि नगारावादन करत बाप्पाला निरोप देण्यात आला. सकाळी ११.३० वाजता कसबा गणपतीचे विसर्जन झाले. गणरायांचे विसर्जन हौदांमध्ये करण्यात आले.

तांबडी जोगेश्वरी

मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजानिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीसमोर वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर, विक्रम साराभाई, एम. विश्वेश्वरय्या अशा थोर पुरुषांच्या तसेच ऑलिंपिक व पॅरालिंपिक स्पर्धांमधील यशस्वी खेळाडू नीरज चोप्रा, अवनी लेखरा, सिन्घराज अधानी, भाविनाबेन पटेल, पी. व्ही. सिंधू यांच्या वेशभूषेतील कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. महापौर मोहोळ यांनी ‘श्रीं’ना पुष्पहार घातल्यानंतर मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान झाली. त्यानंतर मंडपासमोरील हौदात सकाळी ११.३२ वाजता विसर्जन करण्यात आले. पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे हेसुद्धा उपस्थित होते.

गुरुजी तालीम मंडळ

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाला महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात अन् गुलालाची उधळण करत मंडपाजवळील कृत्रिम हौदात श्रींच्या मूर्तीचे १२.३८ वाजता विसर्जन करण्यात आले.

तुळशीबाग मंडळ

तुळशीबाग मंडळाने विसर्जनासाठी आकर्षक गजकुंड तयार करण्यात आला होता. श्रींची पालखीतून मंडपापासून विसर्जन कुंडापर्यंत श्रींची मूर्ती नेताना ढोल ताशांचा गजर करण्यात आला. दुपारी १.१६ वाजता श्रींचे विसर्जन करण्यात आले.

केसरीवाडा

मानाच्या पाचव्या केसरी गणपतीचं वेळेआधीच विसर्जन करण्यात आलं. १:२० मिनिटांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या उपस्थितीत गणरायाला निरोप देण्यात आला.

.......

तुळशीबाग गणपती मंडळाच्या ढोलताशा पथकाला पोलिसांनी रोखले

गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात मिरवणूक आणि वादनाला परवानगी नसतानाही मानाच्या चौथ्या गणपतीसमोर ढोलवादन करण्यात आले. या वेळी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आणि कार्यकर्ते, वादक यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसून आले. ‘आले, आले, रे तुळशीबागवाले आले, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात तुळशीबाग गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मंडळाचे नितीन पंडित म्हणाले, आता पोलिसांनी ढोल ताब्यात घेतले होते. आम्ही रीतसर २-२ ढोलताशांची परवानगी मागितली होती. त्यामुळे कारवाई होणार नाही. पोलिसांनी ढोल परत केल्याचंही त्यांनी या वेळी सांगितले.