पुणे : अनैतिक संबंधांतून पत्नीच्या प्रियकराचा दगडाने मारून खून करणाऱ्या दाम्पत्याला जन्मठेप आणि प्रत्येकी १२ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निकाल दिला आहे. उदलसिंग भवानीसिंग ठाकूर (वय ३२) आणि त्याची पत्नी पूनम (वय २६, दोघेही, रा. जनता वसाहत, मूळ उत्तर प्रदेश) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
चंद्रीकाप्रसाद मंगलप्रसाद यादव (वय ४०, रा. लक्ष्मीनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ नागेंद्र याने याबाबत दत्तवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना २४ सप्टेंबर २०१५ रोजी लक्ष्मीनगर येथे घडली होती. पूनम आणि यादव यांचे अनैतिक संबंध होते. यातून तिने त्याच्याकडून ३० हजार रुपये हातऊसने घेतले होते. ही रक्कम यादव वारंवार परत मागत होता. तसेच, पूनमबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून ठाकूर याच्या मनात त्याच्याविषयी राग होता. त्यातून आरोपी पती-पत्नींनी यादव याचा खून केला. त्यानंतर हातपाय बांधून त्यावर गादी टाकून मृतदेह बेडरूमध्ये ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. घटनेच्या दिवशी यादव हा दुपारी साडेबाराच्या सुमारास मुलगी उषा (वय ४) हिला शाळेत सोडविण्यास गेला तो परत आलाच नाही. यादव यांचा मृतदेह आरोपींच्या घरामध्ये आढळला होता. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी १३ साक्षीदार तपासले. परिस्थितिजन्य पुरावा आणि मृताला आरोपीच्या घरात जाताना पाहणाºयांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. तसेच, दंडापैकी २० हजार रुपये मृताच्या पत्नीला देण्यात यावेत, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाºयाला कोठडीपुणे : पैशाच्या आमिषाने ४ वर्षांच्या मुलीला घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याला १४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला आहे. मिंटू रवी मंडल (वय २७, रा. पेरणे फाटा, मूळ. पश्चिम बंगाल) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना ६ जानेवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास पेरणेफाटा परिसरात घडल. लैंगिक अत्याचारानंतर मुलगी रडायला लागल्यानंतर त्याने तिला मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी मंडल याला न्यायालयात हजर केले. त्या वेळी अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील लीना पाठक यांनी केली.