लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यासह राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य शासनाने एप्रिल महिन्यापासून संपूर्ण राज्यात लाॅकडाऊन जाहीर केला. राज्य शासनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने केवळ होम डिलिव्हरी सुरू आहे. याचा मद्यविक्रीवर परिणाम झाला असून, गतवर्षांच्या तुलनेत यंदा मद्यविक्रीत घट झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र शासनाने लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर काही दिवस दारुची दुकाने बंद ठेवली होती. परंतु शासनाचा महसूल बुडत असल्याचे कारण देत शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून दारूची दुकाने सुरू केली. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य शासनाने देखील केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यास परवानगी दिली. मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवली तरी होम डिलिव्हरी करण्यास मात्र परवानगी दिली. परंतु लाॅकडाऊनमध्ये होम डिलिव्हरी सुरू असली तरी मद्यविक्रीत गतवर्षीच्या तुलनेत घट झाली. पुणे जिल्ह्यात झालेल्या दारूविक्रीतून गतवर्षी शासनाला 1१८०५ कोटी रुपयांचा तर यंदा १७९७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.
------
चालू वर्षी ८ कोटी ९६ लाख लिटर दारू रिचवली
वर्ष देशी विदेशी बीअर
2019-20 29067851 34780170 50052521
2020-21 25677355 31715526 32268469
------------
होम डिलिव्हरीमध्ये दारुविक्री घटली
राज्यात लागू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने व केवळ होम डिलिव्हरीला परवानगी असल्याने एकूण मद्यविक्रीत मोठी घट झाली. यात विदेशी दारूच्या तुलनेत देशी आणि बीअरच्या खपात अधिक घट झाली आहे.
-------
चालू वर्षी दारु विक्रीतून १७९७ कोटींचा महसूल
पुणे जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात सन २०२०-२१ या वर्षात आतापर्यंत शासनाला १७९७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. यंदा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पूर्ण क्षमतेने दारू विक्री सुरू होती. परंतु मार्च महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर केला. याच परिणाम शासनाच्या महसुलावर झाला आहे.
------
शासनाला पुणे जिल्ह्यातून दारूविक्रीतून असा मिळाला महसूल
वर्ष महसूल (कोटीत)
2019-20 1805
2020-21 1797
-------
दोन वर्षांत १९ कोटींची दारु जप्ती
गेले दोन वर्ष जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने अवैध दारू विक्री करणा-यावर कारवाई सुरू होती. यामधून गेल्या दोन वर्षात उत्पादन शुल्क विभागाने तब्बल १९ कोटी रुपयांची अवैध दारू जप्त केली
------
गेल्या दोन वर्षांत केलेली कारवाई
वर्ष केसेस रक्कम (कोटी)
2019-20 3526 9.12
2020-21 3040 8.87
------
लाॅकडाऊनचा दारू विक्रीवर परिणाम
राज्यासह जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनचा जिल्ह्यातील दारूविक्रीवर परिणाम झाला आहे. दारूविक्रीत मोठी घट झाली असून, होम डिलिव्हरीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
- संतोष झगडे , राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक
-------