पुणे: देशात 100 कोटी लसीकरण झाले असून त्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. पुण्यात अजित पवारांची आज पत्रकार परिषद झाली. यामध्ये पवारांनी पुणेकरांनी दिवाळीची गिफ्ट दिली ती म्हणजे दिपावली पहाट कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात 1 कोटी 17 लाख जणांचे लसीकरण झाल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.
पुढे बोलताना पवार म्हणाले, दिवाळीनंतर 100 टक्के क्षमतेने थिअटर सुरू करण्याचा विचार आहे. तसेच गेल्या 9 दिवसांत लसीकरणात वाढ झाली आहे. राज्यात 10 कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. लस घेऊनही 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याचे आढळले. पुणे मेट्रोसाठी 'नागपूर पॅटर्न' राबविला जाणार. पुणे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरू होईल असे पवार यांनी सांगितले.
नवाब मलिक प्रकरणात अजित पवारांचे नो कमेंट
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली, त्यांच्या कुटुंबियांना बोगस म्हटले त्यावर विचारले असता उत्तर देण्याचे अजित पवारांनी टाळले. नो कमेंट, म्हणत मला यावर बोलायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हंटलय.