अजित पवारांची महत्वपूर्ण घोषणा: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 02:45 PM2021-01-08T14:45:37+5:302021-01-08T14:46:10+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामे करताना वाईटपणा स्वीकारावा लागला...

Important announcement of Ajit Pawar: Pimpri-Chinchwad Municipal Corporation will include nearby villages | अजित पवारांची महत्वपूर्ण घोषणा: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार 

अजित पवारांची महत्वपूर्ण घोषणा: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार 

Next
ठळक मुद्देमहापालिकेची होणार हद्दवाढ

पिंपरी : पुणे महापालिकेत काही गावांचा समावेश केला असून, त्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतही लगतच्या गावांना घ्यायचे आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत वाढ होणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चिंचवड येथे शुक्रवारी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पवार बोलत होते. महापाैर उषा ढोरे, मावळचे आमदार सुनील शेळके, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, गावांचे मिळून पिंपरी-चिंचवड शहर तयार झाले. येथील विकासकामे करताना वाईटपणा स्वीकारावा लागला. पुणे-मुंबई महमार्गाचे रुंदीकरण करताना अनेक घरे हटविण्यात आले. तत्कालीन आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचेही घर काढले. विकासकामांसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महापालिकेतील गैरकारभाराची चर्चा होत असते. त्याबाबत आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, त्यानंतर चाैकशी करता येईल. 

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांवर नजर
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सर्वांनी खबरदारी घेऊन कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांवर नजर आहे. प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे. स्वत: पुढे येऊन माहिती द्यावी. कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असतानाच बर्ड फ्लूचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा
गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी आवश्यकतेनुसार काही कायद्यांमध्ये बदल करण्याची सरकारची तयारी आहे. राज्यातील महिला, मुली सुरक्षित राहण्यासाठी शक्ती कायदा तयार करण्याच्या विचार सुरू आहे. त्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे  अजित पवार या वेळी म्हणाले.

Web Title: Important announcement of Ajit Pawar: Pimpri-Chinchwad Municipal Corporation will include nearby villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.