शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी शहरातील सर्व भागातील पाणी पुरवठा बंद

By निलेश राऊत | Published: August 07, 2023 5:11 PM

चतुःश्रृंगी, लष्कर, वडगाव व कात्रज भागातील पाणी पुरवठाही बंद...

पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. यांच्याकडून, २२०/२२ केव्ही पर्वती सबस्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी ( दि. १०) पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील पंपींग, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी पंपींग व वडगाव जलकेंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार आहे. तसेच कोथरूड ब शिवाजीनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

 पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर भागात शुक्रवारी ( दि. ११) रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.पाणी पुरवठा बंद असणारा भाग खालील प्रमाणे :- 

पर्वती  एम एल आर टाकी परिसर:- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती एच एल आर टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी (पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्हें नं ४२,४६ ( कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.

पर्वती एल एल आर परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर,

एस.एन.डी.टी. एम. एल. आर. टाकी परिसर : एरंडवणा, कर्वेरोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हैपी कॉलनी, गोसावी वस्ती, मयूर कॉलनी, सहवास सोसा परिसर गिरीजा शंकर विहार, दशभुजा गणपती परिसर, वकील नगर, पटवर्धन बाग, डीपी रोड, गुळवणी महाराज रोड, गणेशनगर, राहुल नगर, करिष्मा सोसा, संगमप्रेस रोड, सिटी प्राईड परिसर, आयडीयल कॉलनी इ.

चतुःश्रृंगी टाकी परीसर - औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसयटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव परिसर

लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी,

कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळेकरनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणी