पुणे: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला आणि पुणे महापालिका व परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणा-या धरण परिसरात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली असून शनिवारी धरण प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २.५६ टीएमसी एवढा झाला.एकाच दिवसात धरणात ०.३६ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला.जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून शक्रवारी दिवसभर व शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सकाळी सहावाजेपर्यंत पानशेत धरणात १७० मि.मी.,वरसगावमध्ये १५१ मि.मी.,टेमघरमध्ये १९७ मि.मी. तर खडकवासला धरणात ७६ मि.मी.पाऊस झाला. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता,असे खडकवासला धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.शक्रवारी खडकवासला धरण प्रकल्पात २.२० टीएमसी पाणीसाठा होता.शनिवारी त्यात २.५६ टीएमसीपर्यंत वाढ झाली. मान्सून लांबल्यामुळे आणि धरणातील पाणी पातळी घटत असल्यामुळे काळजी व्यक्त केली जात होती. परंतु, मान्सूनचे दिमाखदार आगमन झाल्यामुळे धरणातील पाणी तापळी वाढू लागला आहे.त्यामुळे पुणेकरांवर ओढवलेले पाणी कपातीचे संकट दूर होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस, पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 2:46 PM
जिल्ह्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून शक्रवारी दिवसभर व शनिवारी सकाळी 6 वाजेपर्यंत दमदार पाऊस झाला.
ठळक मुद्देपुणेकरांवर ओढवलेले पाणी कपातीचे संकट दूर होणार