शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

लखलख दिव्यांच्या रथात, दगडूशेठ निघाले थाटात; विसर्जन मिरवणुकीत गणाधीश रथावर सहभागी

By श्रीकिशन काळे | Published: September 28, 2023 5:17 PM

मिरवणुकीवर जलाभिषेक होत असून, गणपती बाप्पाचा गजर, ढोलताशांचा ताल यामुळे मिरवणुकीत आणखीनच रंगत येत असल्याचे पहायला मिळत आहे...

पुणे : यंदा गणेशोत्सवात पहिल्यांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकात सायंकाळी साडेचार वाजता आला आहे. त्यामुळे तो आता लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला असून, गणाधीश थरांमध्ये लक्षलक्ष दिव्यांनी गणरायाचे रूप आणखीनच उजळून निघाले आहे. त्याचे हे रूप टिपण्यासाठी भाविकांनी मोबाईल, कॅमेरे सरसावले आहेत. मिरवणूक लवकर संपविण्याचा निर्धार मंडळांनी केला आणि त्याला दगडूशेठ गणपतीने साथ दिली आहे. मिरवणुकीवर जलाभिषेक होत असून, गणपती बाप्पाचा गजर, ढोलताशांचा ताल यामुळे मिरवणुकीत आणखीनच रंगत येत असल्याचे पहायला मिळत आहे. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अतिशय  थाटात निघाली आहे. यंदा श्री  गणाधीश रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान आहेत. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा आहे. 

श्री गणाधीश रथावर ८ खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर हत्तीची मूर्ती साकारण्यात आली असून, ते गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात न्हाहून निघाला आहे. भगवान शंकरांच्या ८ गणांच्या मूर्ती रथावर आहेत. त्यासोबतच मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २१ फूट इतकी आहे. रथावर १ मुख्य कळस बसविला आहे. तसेच त्याच्या भोवती इतर असे मिळून पाच कळस आहेत. आकर्षक रंगांमध्ये विविध लाईटस् रथावर वापरण्यात आल्या आहेत.

मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन केली जात आहे.तसेच मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा पहायला मिळत आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा थाट पाहण्यासाठी पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने उपस्थित आहेत.‌लहान मुले देखील असून, अनेक भाविकांनी छत्र्या आणलेल्या आहेत. कारण पावसाचा जलाभिषेक मिरवणुकीवर होत आहे.

दगडूशेठ गणपती मंडळमागे अनेक मंडळे असतात मिरवणूक लवकर संपावी हा हेतू आहे. यात कुणालाही डावळण्याचा प्रश्न नाही. आमची मिरवणूक ९ पर्यंत संपेल. संपूर्ण मिरवणूक यंदा किमान ५ ते ६ तास लवकर संपेल.

- महेश सूर्यवंशी अध्यक्ष दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDagdusheth Templeदगडूशेठ मंदिर