बारामती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत बारामती तालुक्यातील ७९ पैकी ३९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्याचा एकूण निकाल ९७.५२ टक्के लागला. तालुक्यात ६२५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ६०९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०२३ मध्ये तालुक्याचा निकाल ९७.७१ टक्के,२०२३ मध्ये ९६.५५ टक्के लागला होता. तुलनेने यंदा निकालात ०९७ टक्के वाढ झाली आहे.तसेच २०२३ मध्ये ४६ शाळांचा,तर २०२३ मध्ये २९ शाळांचानिकाल १०० टक्के लागला होता. यंदाच्या वर्षी १० शाळांची १०० टक्के निकालात वाढ झाली आहे.
तालुक्यातील शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा पुढीलप्रमाणे - नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे,न्यू इंग्लीश स्कुल वाणवडी,विद्या प्रतिष्ठान बाल विकास मंदीर माध्यमिक शाळा,श्री शिरसाइ विद्यालय शिर्सुफळ,न्यु इंग्लीश स्कुल पंधारवस्ती,चोपडज, श्री छत्रपती हायस्कुल सोनगांव,शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर,न्यू इंग्लिश स्कूल मेखळी,विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक हायस्कुल, बारामती,विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर पणदरे,खांडेश्वरी माध्यमिक विद्यालय खांडज,माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी, श्री.बी.एस.काकडे (देशमुख)विद्यालय निंबुत,श्री भैरवनाथ विद्यालय बाबुर्डी,भैरवनाथ विद्यालय कोऱहाळे खुर्द, न्यू इंग्लिश स्कूल ढाकाळे,उर्दू माध्यमिक विद्यालय बारामती,भैरवनाथ माध्यमिक विद्यालय मेडद,उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडी, जनहित प्रतिष्ठान विद्यालय तांदुळवाडी बारामती,विद्या प्रतिष्ठा न्यू इंग्लिश मिडियम स्कूल बारामती,इंग्लिश मिडियम स्कूल माळेगांव बारामती,विजय बालविकास मंदिर बांदलवाडी,श्री. सिद्धेश्वर पब्लिक स्कूल कोऱहाळे बुद्रूक,राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लीश मिडीयम स्कुल खंडूखैरेवाडी,सोमेश्वर पब्लीक स्कुल,शारदा निकेतन इंग्लीश मिडीयम स्कुल,शारदाबाइ पवार विद्या निकेतन डे स्कुल,संत सावतामाळी पब्लीक स्कुल,चैतन्य इंटरनॅशनल स्कूल बारामती,क्रिएटीव्ह इन स्कूल बारामती,ज्ञानसागर इंग्लिश मिडियम स्कूल सावळ,आदित्य इंटरनॅशनल स्कूल वंजारवाडी,सुपे इंग्लीश मिडीयम स्कुल,बीएकेअेपी इंग्लीश मिडीयम स्कुल,या शाळांचा निकाल १०० टक्के जाहिर झाला.
अन्य शाळांच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे...
एमईएस हायस्कुल बारामती- ९९.५६ , श्रीमंत शंभूसिंह विद्यालय माळेगाव बुद्रूक - ९३.३९, छत्रपती शाहू विद्यालय बारामती - ८८.६३,मिशन हायस्कुल बारामती ८०, स्वातंत्र्य विद्यामंदिर वडगाव निंबाळकर - ९४.२५,वस्तीगृह विद्यालय कार्हाटी ९८.१८. श्री. शहाजी हायस्कूल सुपे-९८.३७, के.बी.पाटील विद्यालय सांगवी- ९४.१६,श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुर्टी ९५.०८,मयुरेश्वर विद्यालय मोरगांव ९६.४५,न्यु इंग्लीश स्कुल डोर्लेवाडी ९६.२४,श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालय उंडवडी ९७.१५,आर. एन. आगरवाल विद्यालय बारामती- ९९.६७,श्री सिद्धेश्वर हायस्कूल कोऱहाळे बुद्रूक - ९६.०३,न्यू इंग्लिश स्कूल कारखेल ९४.५४,सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर ९७.५८,एस पवार विद्यालय अॅण्ड ज्यु.काॅलेज शिवनगर बारामती ९९.३९,आनंद विद्यालय होळ ९३.६१,
न्यू इंग्लिश स्कूल लोणी भापकर ९४.५६,सोमेश्वर विद्यालय अंजनगाव - ९५.१२,श्री. विठ्ठल माध्यमिक विद्यालय भिकोबानगर ९७.७५,न्यू इंग्लिश स्कूल खलाटेवस्ती लाटे ९३.५४,वाघेश्वरी विद्यालय निरावागज ९८.७८,कै. जिजाबाइ गावडे विद्यालय पारवडी ९७.६७,हौसाबाई घोरपडे विद्यालय पिंपळी९०.६२,वसंतराव पवार विद्यालय देऊळगांव रसाळ ९८.११,माध्यमिक विद्यालय करंजे सोरटेवाडी ९६.५५,कै.धो.आ.सातव माध्यमिक विद्यालय बारामती ९५.२३,सोमेश्वर विद्यालय मुढाळे ९०.६९,श्री छत्रपती हायस्कुल काटेवाडी ९५.८३,न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी ९५.१२,न्यू इंग्लिश स्कूल नारोळी ९५.६५,श्री छत्रपती हायस्कुल निंबोडी ६५.२१,कै.अनंतराव पवार माध्यमिक विद्यालय पळशी ९०.३२,कवि मोराेपंत शिक्षण संस`था माध्यमिक विद्यालय ९७.५६,अजितदादा इंग्लीश मिडीयम स्कुल ९९.३६.