पाटस : येथील भागवतवाडी परिसरात जबरी घरफोडी करून आठ लाख रुपयांचा ऐवज करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी महेशकुमार बोरसे यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुवास्तु कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये महेशकुमार बोरसे भाडेतत्त्वावर राहत होते. दरम्यान, त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. परिणामी, बंद दरवाजाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कुलूप आणि कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान, घरामधील कपाट उचकटले आणि कपाटातून सोन्या- चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. याप्रकरणी पोलिस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे.