जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 11:29 AM2023-07-12T11:29:30+5:302023-07-12T11:29:47+5:30

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

In Jejuri, the skeleton of the 'Shasan Apna Dari' program shed collapsed; Fortunately there were no casualties | जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

जेजुरीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या शेडचा सांगाडा कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

googlenewsNext

जेजुरी : राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत १३ तारखेला होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडचा सांगाडा रात्री कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

तीर्थक्षेत्र जेजुरीत गुरुवारी ' शासन आपल्या दारी' आणि जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जेजुरीतील पालखी तळावर भव्य दिव्य असा मंडप टाकण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे १ लाख ५७ हजार क्वेअर फूट क्षेत्रफळाचा व सुमारे २१ हजार लोकांसाठी हा भव्य मंडप उभारण्यात येत आहे. गेले आठवडाभर याचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे. मुख्य व्यासपीठ आणि त्यासमोर व्हीआयपी कक्ष त्याच्या मागच्या बाजूला लाभार्थ्यासाठी मंडप उभारला जात होता. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास या कक्षाच्या मंडपसाठी लोखंडी पिलर उभारून सांगाडा तयार करण्यात आला होता. सांगाडा पूर्ण उभारल्यानंतर कामगार झोपण्यासाठी गेले असता हा संपूर्ण सांगाडा अचानक कोसळला. सांगाड्याखाली कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. मात्र कार्यक्रमापूर्वीच सांगाडा कोसल्याने भविष्यातील मोठा अनुचित प्रकार टळल्याची चर्चा आहे.
 
रात्रंदिवस मंडप उभारणीचे काम सुरू असल्याने कामगारांना अजिबात विश्रांती ही मिळत नाही. रात्री ३ वाजता सांगाडा कोसळल्यानंतर ठेकेदाराने रातोरात सांगाडा उभा करण्यासाठी  कामगारांना कामाला लावले आहे. सकाळपर्यंत कोसळलेला संपूर्ण सांगाडा खोलून पुन्हा उभारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही काम करून झोपायला गेलो असता दहा मिनिटातच सांगाडा कोसळल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. 

दरम्यान, या भव्य सोहळ्यासाठी भव्य मंडप, लाभार्थ्यासाठी वितरण व्यवस्था, मान्यवरांसाठी वातानुकूलित कक्ष, विविध उत्पादसकांसाठी बचतगटांसाठी स्टोल, लाभार्थ्यासाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था फिरती स्वच्छतागृहे आदी सोयी सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. 

Web Title: In Jejuri, the skeleton of the 'Shasan Apna Dari' program shed collapsed; Fortunately there were no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.