पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी सकाळपासून मतदारांचे उत्साहाचे वातावरण असे दिसून आले. सहकारनगर मधील विद्या विकास शाळा, अरण्येश्वर विद्यामंदीर, अध्यापक शाळा,वि.स. खांडेकर, शाहू कॉलेज, ई- लर्निग स्कूल, नामदेव शाळा, बिबवेवाडी, अप्पर, इंदिरानगर याभागात सकाळच्यावेळी मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा होत्या. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक होते. सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून अद्याप पर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मतदान सुरू झाल्यापासून पहिल्या दोन तासात पर्वती मतदारसंघात ६.३० टक्के मतदान झाले आहे. तर दूपारी ३ पर्यत पर्यत ३७ . ६६ टक्के मतदान झाले. दूपार १ नंतर मतदानावर गर्दी ओसरली असून सायंकाळी ४ नंतर झोपडपट्टीतील मतदार हळुहळू बाहेर पडत आहे. त्यामुळे पुन्हा या मदतान केंद्रावर गर्दी होत असल्याचे चित्र पर्वती मतदार संघात दिसत आहे.
यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी ( शरद पवार ) पक्षाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यात तिरंगी लढत होत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप काल कदम यांनी केला होता. यामुळे मतदारसंघातील वातावरण तापले होते. मात्र मतदान दिवशी सकाळपासून मतदान केंद्रावर शांततेत प्रक्रिया सुरू होती.
पर्वती मतदार संघातील सहकारनगर येथील 198 क्रमांक येथे मतदान केंद्रावरील मशीनला दुपारी एक वाजता कनेक्शन लिंकिंग एरर आला होता. त्यामुळे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन बदलावे लागले, अशी माहिती पर्वती मतदार संघाचे निवडणूक अधिकारी मनोज खैरनार यांनी दिली.
यावेळी मतदार म्हणाले, बरेच नव मतदारांसहीत ज्येष्ठ नागरिकांनी ही मतदान केल्यानंतर लोकशाहीच्या या उत्सवात आतापर्यत ज्यानी नेक काम केले आहे अशाच उमेदवारांना मतदान केले आहे असे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मतदान हा माझा अधिकार असून तो मी दर वेळेस निभावत आहे. माझे पहिले मत मी१९५७ मध्ये दिले होते. तेव्हा पासून आता पर्यंत एक ही मतदान चुकवले नाही.यामुळे ही यंदा मतदान करून माझा हक्क बजावला आहे. - अर्यमा शालिग्राम (वय ८२ )
संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क दर वेळा न चूकता बजावत असते. यामध्ये शहरातील महानगरपालिका, लोकसभा असो अथवा विधानसधा नित्य नियमाने मतदान करते. मुलाला किंवा सुन सोबत घेवून मतदान करीत असते. - कलावती डोलारे (वय ९४, पर्वती दर्शन )
आमच्या तिघी जणांनी पहिल्यांदाच केले मतदान
मतदानाची पहिली वेळ असल्यामुळे भीती वाटत होती.पण जेव्हा मतदान केलं खूप छान वाटल. देशाची एक जबाबदार नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडल्याचे आनंद आम्हा तिघीना होत आहे. - पूजा नागरे, पूजा गरड, सोनाली नागरे