शहरं
Join us  
Trending Stories
1
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
2
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
3
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
4
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
5
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
6
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
7
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
9
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
10
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
11
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
12
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
13
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
14
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
15
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
16
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
18
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
19
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
20
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार

पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही बाजूच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली; महायुती अन् 'मविआ' मध्ये बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:48 PM

अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबरची मुदत असून ४ मतदारसंघांतील लढत कशी असेल, हे स्पष्ट होणार

पिंपरी : पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चारही विधानसभा मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे नेत्यांची डोकेदुखी वाढली असून, त्यांच्यापुढे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत (दि. ४) बंडखोरांची समजूत काढण्याचे आव्हान आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत मंगळवारपर्यंत होती. दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये धावपळ सुरू होती. त्यानंतर चारही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीत बंडाचे निशाण रोवल्याचे स्पष्ट झाले. सोमवार, दि. ४ नोव्हेंबर अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. आजपर्यंत दाखल झालेल्या अर्जांमधून लढतीचे चित्र समोर आले आहे. भोसरीमध्ये तिरंगी, पिंपरीत बहुरंगी, चिंचवडला चौरंगी आणि मावळमध्ये दुरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

मावळात एकासएक उमेदवार

मावळमधून महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यात प्रमुख लढत आहे. येथे महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार न देता भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. भेगडे यांना भाजपच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला असून, येथे दुरंगी सामना होणार आहे.

चिंचवडमध्ये चौरंगी लढत

चिंचवडमध्ये महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी अर्ज दाखल केला असून, महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर उमेदवार नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी असल्याने चौरंगी लढत दिसत आहे.

पिंपरीत बहुरंगी सामना

पिंपरीमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे उमेदवार असून, भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, आरपीआय आठवले गटाच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी केली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शीलवंत धर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबूकस्वार, शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांचीही अपक्ष उमेदवारी आहे. त्यामुळे येथे बहुरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

भोसरीत तिरंगी की दुरंगी?

भोसरीमध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार महेश लांडगे आणि महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे रिंगणात आहेत. त्याचबरोबर उद्धवसेनेचे रवी लांडगे यांनीही अर्ज दाखल केला आहे. येथे सध्या तिरंगी लढत दिसत आहे.

अर्ज माघारीपर्यंत बंडोबांना थंड करण्याचे आव्हान

अर्ज माघारीसाठी ४ नोव्हेंबरची मुदत आहे. त्यानंतर चार मतदारसंघांतील लढत कशी असेल, हे स्पष्ट होणार आहे. तीन मतदारसंघांमध्ये बंडखोरीचे प्रमाण आहे. बंडोबांना थंड करण्याचे आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४pimpri-acपिंपरीbhosari-acभोसरीchinchwad-acचिंचवडmahesh landgeमहेश लांडगेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा