शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

पुणे जिल्ह्यात ८ हजारांहून अधिक जणांनी सोडले रेशनवरील धान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 1:07 PM

शहरातील अ परिमंडळात सर्वाधिक ७०७ व जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १६१२ जणांनी असा हक्क सोडला आहे...

पुणे : अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी निकषात बसत नसल्यास स्वत: बाहेर पडण्यासाठी ‘गिव्ह इट अप’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या उपक्रमात जिल्ह्यात आतापर्यंत ७१५६ जणांनी तर शहरात २८२० जणांनी रेशनवरील धान्याचा हक्क सोडला आहे. त्यात शहरातील अ परिमंडळात सर्वाधिक ७०७ व जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १६१२ जणांनी असा हक्क सोडला आहे.

शहर, जिल्ह्यात रेशनचे ४० लाख लाभार्थी

जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजना व प्राधान्य योजनेत २६ लाख ७१ हजार १५६ लाभार्थी आहेत, तर शहरात सुमारे साडेतेरा लाख लाभार्थी आहेत. दोन्ही मिळून ४० लाख लाभार्थी आहेत.

काय आहे ‘गिव्ह इट अप’ उपक्रम

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळण्याकरिता पात्र असलेल्या लाभार्थींना लाभ घेण्याची आवश्यकता नसल्यास असे लाभार्थी ते नाकारू शकतात.

कोणत्या तालुक्यात किती जणांनी सोडला रेशनचा हक्क?

तालुका             रेशनचा त्याग केलेले

हवेली                         १७५

बारामती             १६१२

आंबेगाव             ३४२            

भोर                         १८७

दौंड                         ७५०

इंदापूर                         १४६५

जुन्नर                         ४३२

खेड                         ५७५

मावळ                         ४३८

मुळशी                         १३०

पुरंदर                         ४०९

शिरूर                         ६००

वेल्हे                         ४१

एकूण                         ७१५६

शहरातील परिमंडळानुसार रेशनचा हक्क सोडलेले नागरिक

अ             ७०७

ब             ६१

क             १७८

ड             १२५

ई             २०१

फ             १५३

ग             ४९

ह             ४१९

ज             २०९

ल             २४१

म             ४७७

एकूण             २८२०

सप्टेंबर अखेरपर्यंत वाढविली मुदत-

या उपक्रमाला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

धान्य सोडण्याचा हक्क हा ऐच्छिक आहे. ज्यांचे उत्पन्न जास्त आहे तसेच रेशनवरील धान्याची गरज नाही अशांनी तो सोडावा जेणेकरून अन्य गरजूंना त्याचा लाभ देता येईल.

- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे

मला रेशनवरील धान्याची आवश्यकता नसल्याने मी स्वतःहून हा हक्क सोडला आहे.

- अनंत देशपांडे, कात्रज

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र