शिरूरमध्ये अजित पवार गटाच्या कटकेंचा शरद पवार गटाच्या पवारांना पाठिंबा; राजकीय घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:16 PM2024-11-05T19:16:28+5:302024-11-05T19:16:55+5:30

अजित पवार गटाचे खंदे समर्थक शांताराम कटके यांनी पाठिंबा दिल्याने अशोक पवार यांची ताकद वाढली

In Shirur Ajit Pawar group shantaram Katake support Sharad Pawar group ashok Pawar Speed up political events | शिरूरमध्ये अजित पवार गटाच्या कटकेंचा शरद पवार गटाच्या पवारांना पाठिंबा; राजकीय घडामोडींना वेग

शिरूरमध्ये अजित पवार गटाच्या कटकेंचा शरद पवार गटाच्या पवारांना पाठिंबा; राजकीय घडामोडींना वेग

शिरूर : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी गटाचे माजी जिल्हाध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक शांताराम कटके यांनी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिरूर हवेली तालुक्यांच्या विकासासाठी आम्ही दोन्ही बापू एकत्र आल्याचे यावेळी कटके यांनी सांगितले.

आज वाघोली येथे कटके यांच्या निवासस्थानी त्यांनी आ. अशोक पवार व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा जाहीर केला. आपण इतकी वर्षे अजित पवार यांच्याशी निष्ठेने काम केले. पक्षात अनेक सक्षम उमेदवार असताना अजित पवार यांनी शिवसेनेचा आयात उमेदवार शिरूर व हवेलीकरांच्या माथी मारला आहे. दिलेला उमेदवार याचा अजित पवार व पक्षाच्या मूल्यांशी अजिबात संबंध नसल्याने आपण उमेदवारी मागे घेत आया. अशोक पवार यांना पाठिंबा दिला आहे, असे कटके यांनी म्हटले.

अशोक पवार यांची ताकद वाढली 

माघार घेण्याच्या दिवशी माघार घेत अपक्ष भाऊसाहेब जाधव व शिवाजी कदम यांनी आ. अशोक पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला, तर आज अजित पवार गटाचे खंदे समर्थक शांताराम कटके यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आ. पवार यांची ताकद वाढली आहे. शांताराम कटके यांचा वाघोलीसह हवेली तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे, तसेच ते ज्ञानेशवर कटके यांचे कट्टर विरोधक असल्याने याचा आ. अशोक पवार यांना मोठा लाभ होणार आहे.

Web Title: In Shirur Ajit Pawar group shantaram Katake support Sharad Pawar group ashok Pawar Speed up political events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.