पुणे : शासनाच्या वतीने राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गतअंत्योदय योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब एक किलो साखरेचे वाटप केले जाते. गेल्या तीन महिन्यांची साखर वेळेत न पोहोचल्याने जानेवारी ते मार्चपर्यंतची साखर वाटप शिल्लक होती. ही साखर आता उपलब्ध झाली असून, तीन महिन्यांच्या साखरेचे आता वाटप सुरू होणार आहे. यामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचा उन्हाळा गोड होणार आहे.
जिल्ह्यात आजही रेशनवर मिळणाऱ्या धान्यावर जगणाऱ्या गरीब व सर्वसामान्य कुटुंबांचे प्रमाण अधिक आहे. परंतु शासनाकडून केवळ तांदूळ आणि गहू दिला जातो. यामध्ये केवळ अंत्योदय कुटुंबाला दरमहा एक किलो साखर दिली जाते. परंतु गेले तीन महिने साखरच मिळाली नव्हती. आता तीनही महिन्यांची साखर उपलब्ध झाली असून, वाटप सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यात साडे आठ लाखांपेक्षा अधिक रेशनकार्डधारक असून, यापैकी थोड्याच लोकांना धान्य वाटप केले जाते. अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना साखर देण्यात येत आहे.
कोणत्या तालुक्यात अंत्योदयचे किती लाभार्थी व एक महिन्याची साखर
तालुका अंत्योदय लाभार्थी साखर ( क्विंटल )
आंबेगाव 5143 51.43
बारामती 7937 71.37
भोर 1899 18.99
दौंड 7406 74.06
हवेली 207 3
इंदापूर 4579 45.79
जुन्नर 6777 67.77
खेड 3005 30.05
मावळ 1853 17.53
मुळशी 477 4.77
पुरंदर 5216 52.16
शिरूर 4130 41.3
वेल्हा 519 5.19
एकूण 49048 490.48