शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

ड्रग तस्कर गेला त्या हॉटेलात पोलिसही दिसला फुटेजमध्ये,  चर्चांना उधाण; ...तेथे पोलिस कर्मचारी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 9:13 AM

पोलिसांनी हॉटेलचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ललितपाठोपाठ काही मिनिटांनी संबंधित पोलिस कर्मचारीदेखील त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत दिसल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

नितीश गोवंडे

पुणे : ललित पाटील या ड्रगतस्कराने २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास ससून रुग्णालयातून पळ काढला. तेथून जवळच असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो गेल्याचे सीटीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ललितपाठोपाठ काही मिनिटांनी संबंधित पोलिस कर्मचारीदेखील त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत दिसल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

ललित पाटील याने पोलिस गार्डला धक्का मारून ससून रुग्णालयातून पलायन केले होते, तर संबंधित पोलिस कर्मचारी नेमका त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये कसा पोहोचला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाशी संबंधित आणि ललित पाटील पलायन प्रकरणात ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असेल, त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.

चौकशी होणे गरजेचे   - ललितला अनेक महिन्यांपासून कोणत्या आजाराने ग्रासला होता. त्याच्यावर कोणता उपचार सुरू होता हा प्रश्न आहे.  -  यासाठी अधिष्ठातांसह, डॉक्टरांची चौकशी होणे गरजेचे आहे.

‘कैदी ॲडमिट करा’     आजार असाे किंवा नसाे; आमचा कैदी पेशंट ॲडमिट करून घ्या, असे राजकीय व्यक्तींकडून डाॅक्टरांना निरोप येत आहेत. ॲडमिट केल्यानंतर आम्हालाच टीकेचे धनी व्हावे लागते.  ताेंड दाबून बुक्क्यांचा मार सोसावा लागतो, असे येथील डॉक्टर सांगतात. 

‘डॉक्टरांना सहआरोपी करा’- प्रमुख आरोपी ललित पाटीलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सहआरोपी करा, अशी मागणी आ. रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांकडे केली.   - तो आजारी असल्याचा बहाणा करून ससूनमध्ये आल्यावर सहा डॉक्टर उपचार करीत होते. त्यात अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हेही होते.  

तो देशाबाहेर गेला?ड्रग्जमाफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण, त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना गुन्हे शाखेने नेपाळ सीमेजवळून सोमवारी ताब्यात घेतले. त्यामुळे ललित नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

न्यायालयाने पोलिसांना खडसावले‘इतके दिवस ललित पाटील ताब्यात होता, त्याला जे आहे ते सांभाळता आले नाही आणि आता भूषण पाटील व अभिषेक बलकवडे या आरोपींसाठी पोलिस कोठडी मागताय? पोलिस खात्याची प्रतिष्ठा पणाला लागल्याने पोलिस कोठडी मागताय का, असे कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना  सुनावले. अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर न्यायाधीशांनी नवीन कायदा आलाय माहितीये ना? एकाच वेळी चौदा दिवसांची पोलिस कोठडी घेणे योग्य होणार नाही, असे सांगितले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ