शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

Vasant More: एकीकडे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा अन् दूसरीकडे...; वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 2:17 PM

Vasant More: वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती.

मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. अजित पवारांच्या या ऑफरनंतर वसंत मोरे लवकरच मनसे पक्ष सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना जाहीर नाराजी बोलावून दाखवली होती. पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना सांगितल्या आहेत, असं वसंत मोरेंनी सांगितलं.

'अजित' मार्गावर यावेच लागते भावा'; वसंत मोरेंचा व्हिडिओही शेअर केला, रुपाली पाटलांची पोस्ट चर्चेत

वसंत मोरेंनी जाहीर नाराजी बोलावून दाखवल्यानंतर ते पक्षाला रामराम ठोकत नवीन पक्षात समील होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र याचदरम्यान वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट लक्ष वेधत आहे. वसंत मोरेंच्या उपस्थितीत मंगळवारी काही महिलांनी मनसेत प्रवेश केला. खडकवासला विधानसभा मतदार संघात अनेक महिला भगिनींनी माझ्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याचं स्वत: वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे सांगितलं.

तत्पूर्वी, वसंत मोरेंनी जाहीर नाराजी बोलावून दाखवल्यानंतर मनसेचे पुण्यातील नेते बाबू वागस्कर यांनी सदर प्रकणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. वसंत मोरेंनी व्यक्त केलेल्या नाराजीवर पक्ष अधिकृतपणे दोन दिवसात भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती बाबू वागस्कर यांनी दिली. वसंत मोरे सातत्याने पक्षाची बदनामी होईल, अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत दोन दिवसांत विचार केला जाईल, असं मनसेनं ठरवल्याचे सांगण्यात येत आहे. आज पुण्यातील मनसे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत वसंत मोरे यांनी दांडी मारल्याचे दिसून आले. 

आगामी निवडणुकीत नवीन झेंडा हातात घेणार?; वसंत मोरेंनी स्पष्टच सांगितलं, पक्षनेतृत्वावरही बोलले!

दरम्यान,  सध्या मी मनसे पक्षातच आहे. आगामी निवडणुकी जवळ येताय. त्यावेळी वसंत मोरे कुठे असतील, असा प्रश्न वसंत तात्यांना विचारला असता, मी सध्या कुठल्याही वाटेवर नाही. परंतु पक्षनेतृत्व आणि पक्ष याच्यावर मी नाराज नाही. मात्र पुण्यातील जी कार्यकारणी आहे, ती मला वारंवार डावलतेय. माझी कामे आणि सामान्या लोकांमधील असलेली प्रसिद्धी या लोकांना बघवत नाही, असं म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला घराचा आहेर दिला. तसेच राज ठाकरेंना वारंवार सांगूनही मला टाळण्यात येतंय. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी मला वाटलं राज ठाकरे पुण्यातील नेत्यांना काहीतरी बोलतील, मात्र असं काहीच झालं नाही, असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मी मनसेतून गेल्यास पक्षाला फरक पडेल, परंतु इथल्या स्थानिक नेत्यांना आनंद होईल, असा दावा देखील वसंत मोरे यांनी केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPuneपुणे