शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Pune Darshan Bus: पुणे दर्शनमध्ये महात्मा फुलेंचा वाडा वगळला; प्रशासनाने दिले 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 3:12 PM

पर्यटकांना पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत यासाठी पीएमपीएलने पुणे दर्शन ही बस सुरू केली आहे

पुणे : पीएमपीएलच्या पुणे दर्शन या बसमधून महात्मा फुले यांचा गंजपेठेतील वाडा वगळण्यात आला आहे. तिथे झालेल्या अतिक्रमणांमुळे बस आत नेता येत नाही व दूरवर उभी केली, तर प्रवासी तिथे चालत जात नाहीत, असे कारण त्यासाठी प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

पर्यटकांना पुण्यातील ऐतिहासिक ठिकाणे पाहता यावीत यासाठी पीएमपीएलने पुणे दर्शन ही बस सुरू केली आहे. त्यात शहरातील २१ ठिकाणे आहेत. त्यामध्ये शनिवारवाडा, केळकर संग्रहालय अशा अनेक ठिकाणांरोबरच समता भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महात्मा फुले वाड्याचाही समावेश आहे.या वाड्याभोवती मागील काही वर्षात बरीच अतिक्रमणे झाली आहेत. शहराच्या मध्यवस्तीत असल्याने तिथे मोठी बस नेते येत नाही असे कारण देत पीएमपीएल प्रशासनाने हा वाडाच पुणे दर्शनच्या बसमधून वगळून टाकला आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध उठल्यानंतर पीएमपीएलनेे तिथे गाडी घेऊन जाणे बंद केले आहे. नागरिकांमधून याविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे म्हणाले, की पीएमपीएल प्रशासन सांगते आहे ती सबब खरी असली तरी योग्य नाही. अतिक्रमण काढणे, त्याबाबत महापालिका प्रशासनाला कळवणे हे त्यांचे काम आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने याची तत्काळ दखल घ्यावी व अतिक्रमणे काढून टाकावीत. आद्य समाजक्रांतीकारक असणाऱ्या या दाम्पत्याचे घर वगळणे चुकीचे आहे. योग्य ती कार्यवाही झाली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मोरे यांनी दिला.

पुणे दर्शनची गाडी लांबीने बरीच मोठी आहे. त्या परिसरात ही गाडी जात नाही. तरीही नेलीच तर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे गाडी त्या ठिकाणापासून दूर लावली तर मग प्रवासी तिथपर्यंत चालत जात नाहीत. अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करणे हाच त्यावरचा मार्ग आहे असे पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक राजेश रूपनवर यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Mahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडाBus DriverबसचालकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिक