वेल्हे: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी वेल्हे तालुक्यातील अडवली सकल मराठा समाजातील बांधवांसोबत शालेय विद्यार्थी साखळी उपोषण सुरु केले आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे सरकारला चाळीस दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत संपली असून मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणास सुरुवात केली आहे. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देत वेल्हे तालुक्यातील अडवली येथील सकल मराठा समाजातील बांधवांनी अडवली येथे साखळी उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यत साखळी उपोषण सुरु आहे. तसेच नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नारायण राणे यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. घंटानाट सुरु असून गावातील युवक यामध्ये सहभागी झाले आहेत.
यावेळी माजी सरपंच गोपाळ इंगुळकर, कॄष्णा नाकती, उपसरपंच संभाजी इंगुळकर योगेश इंगुळकर नाना बडे ऋषिकेश इंगोळकर सचिन शेलार मंगेश इंगुळकर ,नितीन इंगुळकर,अक्षय काटकर,सचिन इंगुळकर,दशरथ काटकर, आदीसह तालुक्यातील युवक व सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.