शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

आडतदारांची अडवणूक; शेतकरी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:52 PM

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी होणाºया कांदा लिलावप्रक्रियेत अचानक जुन्या आडतदारांनी लिलाव न करण्याचा पवित्रा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कजुन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर रविवारी होणाºया कांदा लिलावप्रक्रियेत अचानक जुन्या आडतदारांनी लिलाव न करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात धडक देत जाब विचारला. सभापतींनी मध्यस्थी करीत आश्वासन दिल्यानंतर लिलाव पुन्हा सुरळीत झाला.या वेळी बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजयराव काळे यांनी शेतकरी व आडतदार यांच्याशी चर्चा करून समजूत काढली. सदर गाळेवाटप निर्णय तातडीने स्थगित करून शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी व आडतदार यांच्यात समन्वय साधून हा प्रश्न सोडविण्यात येईल, असे आश्वासन सभापती काळे यांनी शेतकºयांना दिले. याबाबत मंगळवारी बैठक घेण्यात येईल, असे सांगितल्यानंतर लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.जुन्नर येथील मुख्य कार्यालयाच्या आवारात रविवारी कांद्याचे लिलाव सुरू होते. बाजार समिती प्रशासनाकडून कांदा आडतदार सुशील घोलप यांना कांदा, बटाटा व लसूण ठेवण्यासाठी बाजार समितीच्या आवारातील फूलमार्केट शेडमधील दोन गाळे देण्याचे पत्र आडतदार व बाजार समितीचे संचालक धनेश संचेती यांना देण्यात आले होते. धनेश संचेती यांना आडतदार सुभाष परदेशी यांच्याकडील काढून घेण्यात आलेल्या दोन गाळ्यांचा वापर करण्याचे सांगण्यात आले. मात्र, या निर्णयाला विरोध करीत जुन्या आडतदारांनी अचानक कांदा लिलाव न करण्याचा निर्णय घेतला.सध्या कांद्याला बाजारभाव असल्याने लिलावासाठी मोठ्याप्रमाणात शेतकरी बाजार समितीत उपस्थितीत होते. लिलाव बंद झाल्याने शेतकरी संतप्त होऊन बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात धाव घेतली.बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. संजयराव काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, प्रकाश ताजणे यांनी आंदोलक शेतकºयांशी या वेळी चर्चा करून समजूत काढली.बाजार समितीत नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर विद्यमान सभापती संजय काळे व विरोधी गटातील संचालक धनेश संचेती यांच्यातील एकमेकांना शहकाटशह देण्याच्या राजकीय भूमिकेतून सदरचा प्रकार घडला असल्याची चर्चा बाजार समितीत रंगली होती.बाजार समितीच्या काही संचालकांनी राजकीय हेतूने त्रास देण्याच्या उद्देशातून आम्हा व्यापाºयांना अगोदरच जागेची अडचण असताना इतर आडतदारांना बाजार समितीतील गाळे दिले. याबाबत प्रशासनाने पूर्वकल्पना न देता ऐनवेळेस गाळे देण्याचे पत्र देण्यात आले. या एकतर्फी निर्णयाला विरोध करण्यासाठी आडतदारांनी बाजार समितीला जाब विचारला. त्यामुळे बाजार समितीने या प्रकाराला स्थगिती देऊन यासंदर्भात मंगळवारी बैठकीचे आयोजन केले आहे. - धनेश संचेती, बाजार समिती संचालक व आडतदार व्यापारीजुन्या आडतदारांची मोनोपॉलीबाजार समितीमध्ये जुन्या आडतदारांनी मोनोपॉली निर्माण केली आहे. नवीन आडतदारांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. लिलाव बंद करून शेतकºयांना वेठीस धरण्याचा प्रकार योग्य नाही, अशी प्रतिक्रिया कांदा आडतदार सुशील घोलप यांनी व्यक्त केली.