बारामती गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 02:09 AM2018-09-17T02:09:50+5:302018-09-17T02:10:23+5:30

शहराचा सर्वांगीण विकास होताना त्याला पक्षीय राजकारणातून गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी दिला.

Inauguration of Baramati Ganesh Festival | बारामती गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन

बारामती गणेश फेस्टिव्हलचे उद्घाटन

Next

बारामती : शहराच्या सांस्कृतिक परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होत आहे. शहराची स्वतंत्र सांस्कृतिक परंपरा आहे. मात्र, शहराचा सर्वांगीण विकास होताना त्याला पक्षीय राजकारणातून गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी दिला.
येथील बारामती गणेश फेस्टिव्हल २०१८ चे उद्घाटन दीपप्रज्ज्वलन करून पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले, की या फेस्टिव्हलला किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध करण्यापेक्षा बारामतीकर नागरिकांकरिता अशा पद्धतीचे गणेशोत्सव साजरे करा की, ज्यातून समाजातील सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ आपल्या कुटुंबासमवेत बसून अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. विनाकारण खीळ घालण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
बारामती गणेश फेस्टिव्हलचे आयोजक नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, पंचायत सभापती संजय भोसले, संदीप जगताप, राजेंद्र काटे, इम्तियाज शिकीलकर, संभाजी होळकर, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी बारामती गणेश फेस्टिव्हलमध्ये हभप निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.

Web Title: Inauguration of Baramati Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.