पुणो : कॉसमॉस बँकेच्या गणोशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवर या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर या इमारतीत करण्यात आला असून, सहकारी बँकिंग क्षेत्रतील सर्वात मोठे कार्यालय साकारण्यात आले आहे.
कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष मिलिंद काळे, संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर, व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते. गोयल म्हणाले, की स्थापनेपासून विविध स्थित्यंतरे पाहिलेल्या बँकेचे ‘स्टेट ऑफ आर्ट’ असे कॉर्पोरेट कार्यालय उभारण्याचे स्वप्न संचालकांनी पाहिले होते. कॉसमॉस टॉवर या 15 मजली इमारतीच्या रुपाने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. मंगळवारी (दि. 25) दुपारी 1.3क् वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होत आहे. या वेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनकवडे आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गणोशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या मैदानावर होणार आहे.
एकूण 2.7क् लाख चौरस फुटाचे बांधकाम असलेल्या कॉसमॉस टॉवरमध्ये 2 बेसमेंटसह 15 मजले आहेत. एकूण 8क् हजार चौरस फूट पार्किग तर 1.5 लाख चौरस फूट ऑफिस वापराची जागा असणार आहे. या इमारतीच्या उत्तम वास्तुरचनेमुळे गणोशखिंड रस्त्यावरील शोभेत भर टाकली आहे.
पर्यावरणाच्यादृष्टीने इमारतीमध्ये सर्वप्रकारची काळजी घेण्यात आली आहे. प्रशस्त सभागृह, कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, जिम, मेडिकल रूम, योगा सेंटरची निर्मिती या इमारतीत करण्यात आली आहे. सहकारी बँकांमध्ये असे कॉर्पोरेट कार्यालय असलेली कॉसमॉस ही एकमेव बँक असेल, असे गोयल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
करन्सी चेस्टची सुविधा
4करन्सी चेस्ट ही सुविधा असलेली कॉसमॉस बँक ही भारतातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. रिझव्र्ह बँकेकडून बँकेला ही सविधा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयामध्ये ही सुविधा सुरू झाली असून, विविध बँकांची रक्कम याठिकाणी ठेवण्यात येत आहे. त्यासाठी बँकेने सुसज्ज यंत्रणा उभारली असल्याची माहिती कृष्णकुमार गोयल यांनी दिली.