सदर पूल जीर्ण होऊन मोडकळीस आला होता. अनेक वर्षांपासून नागरिकांची पूल व्हावा यासाठी मागणी होत होती. मजुरी, बाजारहाट, वैयक्तिक कामे, प्रवास यामुळे या पुलावरून फार मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. त्याच बरोबर हडसर किल्ला, जीवधन किल्ला, नाणेघाट व माळशेज घाट या महत्वाच्या पर्यटनस्थळांना जोडणारा हा मार्ग व त्यावरील पुलाचे उद्घाटन झाल्याने पर्यटनाला देखील मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गावातील अनेक कामांची निवेदने दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, पीडीसीसी बँकेचे संचालक तुळशीराम भोईर, कॉन्ट्रॅक्टर दिलीप शेवाळे , सरपंच जयश्री कोकाटे, उपसरपंच प्रवीण कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य योगिता साबळे, अनुसया घोडे, विलास डावखर, पोलीस पाटीलदेवराम डावखर , , श्री रोहिदास गोडे , गेणभाऊ लांडे , चंद्रकांत साबळे, दुंदा घोडे, शांताराम घोडे , शंकर घोडे आदी मान्यवर ग्रामस्थ व तरुण उपस्थित होते. सूत्रसंचालन गोविंद साबळे यांनी केले.
तळेरान येथे पावणेचार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:09 AM