प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली येथे डिजिटल बोर्डाचे उद्घाटन व वर्धापन निमित्त घेतलेली शिबिराचे आयोजन घेण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत भोंगवली सरपंच अरुण पवार व सूर्यकांत कराळे तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी भोर डॉ. साहिल जाधव, वैद्यकीय अधिकारी मंदा वाल्हेकर, किरण भदे, वैभव धाडवे, उपसरपंच महादेव शिनगारे, डॉ. कोल्हे ,डॉ. सोनाली जगताप, सुशांत मोहिते, कनिष्ठ सहाय्यक भोंगवली इत्यादी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात प्रथमच ग्रामीण भागातील भोंगवली आरोग्य केंद्रात डिजिटल बोर्ड बसविल्यामुळे सर्व प्रकारची माहिती रुग्णांना मोफत मिळणार आहे.डॉक्टर साहिल जाधव वैद्यकीय अधिकारी, डॉ. सोनाली जगताप समुदाय आरोग्य अधिकारी यांनी मार्गदर्शन केले
शलाका ताई कोंडे (जि. प. सदस्य) रोहन बाठे प.स भोर यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन श्रीम. कल्पना आवाळे यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. साहिल जाधव वैद्यकीय अधिकारी व सुशांत मोहिते (कनिष्ठ सहायक) यांनी आभार मानले . डिजिटल बोर्ड वर येणाऱ्या योजना अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रम असून आरोग्य केंद्रकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे, असे मत
डॉक्टर सूर्यकांत कराळे, तालुका आरोग्य अधिकारी, भोर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
भोंगवली आरोग्य केंद्रात डिजिटल बोर्डाचे उद्घाटन करताना मान्यवर
छाया- स्वप्निलकुमार पैलवान.