जितो स्पोर्ट कमिटीने आयोजित केलेल्या या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये आठ टीमने सहभाग नोंदवला आहे.
राणावत ग्रुपचे विशाल राणावत हे प्रमुख टायटल स्पाॅन्सर असून, ओनेक्स ग्रुपचे विक्रम पालेशा हे को टायटल स्पाॅन्सर आहेत. बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक केंद्राच्या मागे मिडटाऊन ग्राउंड येथे हे तीन दिवस सामने रंगणार आहेत. जितोमध्ये इतर कार्यासोबत स्पोर्टलादेखील प्रचंड महत्त्व देण्यात येते. दरवर्षी जितो मेंबरसाठी अशा विविध स्पर्धेचे आयोजन जितोच्या वतीने केले जाते.
या उद्घाटनप्रसंगी जितोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी,जितो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका,जितोचे चीफ सेक्रेटरी पंकज कर्नावट, सेक्रेटरी चेतन भंडारी, इंदर छाजेड, राजेंद्र भाटीया, अजय मेहता, मनोज छाजेड, संतोष जैन, हितेश शहा, दिनेश जीरावाला, गौरव नहार,लकीशा मर्लेचा, रेखा कांगटानी,वनिता मेहता यांच्यासह जितोचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पोर्ट कमिटीचे संघवी दिलीप जैन, पुनीत कोठारी यांच्यासह त्यांच्या टीमचे सर्व सदस्य ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
फोटो ओळ : जितो मेंबर लीगचे उद्घाटन करताना जितोचे पदाधिकारी.