पुणे : आपल्या सकारात्मक विचार आणि मानवतावादी दृष्टिकोनामुळे अग्रवाल समाज फेडरेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्ये केली जातात. त्याचा एक भाग म्हणजे नुकतेच अग्रवाल समाज फेडरेशनद्वारा संचलित महानगरपालिका मान्यताप्राप्त कोविड केअर सेंटरचा उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल हे होते.
कोट
कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरत चालली आहे. ज्यामध्ये अनेक कुटुंबे बाधित होत आहेत. रुग्णालायमध्ये वाढणाऱ्या गर्दीमुळे गंभीर आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे रुग्ण गंभीर होतो. त्यामुळे सुरुवातीच्या चाचण्यांमध्येच जर कोरोना संसर्गाबद्दल समजले तर अशा रुग्णांना त्यांच्या कुटुंबांना कोविड केंद्रातील सुविधांचा लाभ देता येऊ शकतो.
- कृष्ण कुमार गोयल
या वेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद बन्सल, सचिव के. एल. बन्सल, कोषाध्यक्ष श्याम गोयल, समन्वयक संजीव अग्रवाल, डॉ,अशोक अग्रवाल, डॉ. संदीप अग्रवाल, व्यापार समिती अध्यक्ष दीपक बन्सल, विशाल अग्रवाल, योगेश अग्रवाल, संजय अग्रवाल, चेतना अग्रवाल, डॉ. डॉली अग्रवाल आदी उपस्थित होते.
या कोविड केअर सेंटर हेल्पलाइन नंबर ९६७३७५७९९९, ९२०९०९४००१ फोटो ओळ-
डॉ. संदीप अग्रवाल यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष विनोद बन्सल, सचिव के. एल. बन्सल, विशाल अग्रवाल कार्यकारिणी सदस्य.