पुणे : उपराष्ट्रपतींच्या हस्ते अत्यंत घाईत उद्घाटन आटोपलेल्या महापालिकेच्या नव्या इमारतीत पदाधिकाऱ्यांच्या ‘कार्यालय प्रवेश’ साठी थेट आॅगस्ट, सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्घाटन झालेल्या सभागृहाची देखील अनेक लहान-मोठी कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याचे प्रशासनाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्या अधिकाºयांच्या या माहितीवरून काम अर्धवट असतानाच उद्घाटन करण्यात आल्याचे समोर आले आहे.महापालिकेच्या या इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात करण्यात आले. इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील सर्वसाधारण सभा नव्या सभागृहात घेण्यात येईल, असा ठाम विश्वास पदाधिकाºयांनी व्यक्त केला होता.मात्र, काम पूर्ण नसताना तिचे उद्घाटन होत असल्याचा आक्षेप महापालिकेतील विरोधी पक्षांनी घेतला होता. त्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. तरीही, बहुतांशी कामे करण्यात आल्याचा दावा करीत सत्ताधारी भाजपाने या इमातीचे उद्घाटन केले. त्यानंतर साधारणत : आठवडाभरात या इमारतीतून कामकाज सुरू होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, सर्वच मजल्यांवरील पदाधिकाºयांची दालने, सभागृह आणि छतावरील काही कामे राहिल्याचे महापालिकेच्या भवनरचना विभागाने सांगितले. ती पूर्ण करण्यासाठी सव्वा ते दीड महिन्यांचा अवधी लागेल, असेही सांगण्यात आले.निकृष्ट कामाची तक्रार करून दुर्लक्षमहापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचे उद्घाटनप्रसंगी मुख्य सभागृहाला गळती लागली. महापालिकेच्या अभियंते, कनिष्ठ अधिकाºयांच्या डोळ्यांसमोर निकृष्ट पद्धतीने काम सुरु असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँगे्रसच्या महापालिका प्रशासनाला वेळोवेळी लेखी पत्र देऊन करण्यात आली. त्यानंतर देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, कामाची व अधिकाºयांची चौकशी करण्याची मागणी रष्ट्रवादी काँगे्रसचे दिनेश खराडे यांनी केली आहे.
पालिकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन , आॅगस्टमध्ये ‘कार्यालय प्रवेश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 7:11 AM