बाजार समितीच्या चार एकर जागेमध्ये सुसज्ज कार्यालय व व्यापारी गाळे उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी रस्ते विद्युत व्यवस्था या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. पाबळ परिसरातली वीस-बावीस गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार कृषिमाल असून, विक्रीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे, असे बाजार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट वसंतराव कोरेकर यांनी सांगितले. पाबळ येथील उपबाजार केंद्र सुरू व्हावे यासाठी माजी सभापती शंकर जांभूळकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे, पंचायत समिती उपासभापती सविता पऱ्हाड, माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समिती सदस्य सुभाष उमाप व बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.
पाबळ कृषी उपबाजारचे रविवारी उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:09 AM